अमर पाटील, प्रतिनिधी
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 12 संचालक गैरहजर राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी कोरम अभावी सभा तहकूब केली. महाविकास आघाडीचे 13 संचालक यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देऊन सांगितलं. निवडीसाठी असा कोणताही नियम नाही की इतके संचालक उपस्थित राहावे लागतात. आम्ही बहुमतात आहोत, त्यामुळे आमच्यातील अध्यक्ष शशिकांत पाटील चुयेकर यांना करावे. महाविकास आघाडीचे संचालक अभिजीत ताईशेटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जरी सभा तहकूब केली असली तरी आमचे अध्यक्ष म्हणून शशिकांत पाटील चुयेकर हे राहतील. या निवडीच्या घडामोडीनंतर आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळच्या प्रशासनाला पत्र देण्यात येणार असून यामध्ये प्रशासनाने अध्यक्ष शशिकांत पाटील चुयेकर यांच्याकडे गोकुळचा कारभार सोपवावा, अशी मागणी करणार असल्याचे समजते.