दुष्काळाची मदत शेतकऱ्यांना मिळणारच आहे. सगळ्या सवलती दिल्याही जाणार आहेत, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी आज दसरा मेळाव्यातून केलेली आहे. मी मुख्यमंत्री असताना NDRF चे सर्व नियम बाजूला ठेवत मदत केली होती. आता 32 हजार कोटींचं नियोजन कर्जमाफीसाठी केलं आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ठाकरेंव जोरदार हल्ला चढवला.असा आरोप करता, पण बांधावर साधा बिस्किटाचा पुढा तरी घेऊन जाता का?
संकटाच्या वेळी तुम्ही राजकारण करता, हे पाप कुठे फेडणार आहे. शेतकऱ्याचं पीक पूर्णपणे होरपळत असताना तुम्ही वोट चोरीचं आंदोलन करता आणि फेक नॅरेटिव्ह पसरवात, अशी टीका केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.