PM Modi NCP MPs Meeting: नवी मुंबई विमानतळ नामकरण ते उजनीचं पाणी… पवारांच्या खासदारांनी पंतप्रधानांसमोर मांडल्या ‘या’ मागण्या

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या आठ खासदार प्रतिनिधींनी संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली.

PM Modi NCP MPs Meeting: नवी मुंबई विमानतळ नामकरण ते उजनीचं पाणी… पवारांच्या खासदारांनी पंतप्रधानांसमोर मांडल्या ‘या’ मागण्या

PM Modi NCP MPs Meeting:  नवी दिल्लीत संसदेच्या चालू अधिवेशनादरम्यान राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या आठ खासदार प्रतिनिधींनी संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. अत्यंत मोकळ्या वातावरणात पार पडलेल्या या 15 मिनिटांच्या बैठकीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रातील शेती, पायाभूत सुविधा आणि जलप्रकल्पांशी संबंधित विविध स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद साधण्यात आला.

खासदार सुप्रिया सुळेंकडे पवार साहेबांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी

बैठकीची सुरुवात अत्यंत कौटुंबिक आणि आपुलकीच्या वातावरणात झाली. सर्व खासदार कक्षात पोहोचताच पंतप्रधान मोदींनी सर्वप्रथम पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्याकडे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारणा केली. या वेळी बोलताना पंतप्रधानांनी शरद पवारांच्या या वयातील अफाट कार्यक्षमतेचे विशेष कौतुक केले. पवारांची हीच ऊर्जा आणि निष्ठा देशातील प्रत्येक लोकप्रतिनिधीसाठी प्रेरणादायी असून सर्वांनी त्यांचा हा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, अशा शब्दांत मोदींनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.

बीडच्या पाण्याच्या समस्येपासून रेल्वे प्रकल्पांपर्यंत विविध मागण्यांचे निवेदन

कुशलक्षेमानंतर लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघातील ज्वलंत समस्यांचा पाढा पंतप्रधानांसमोर वाचला. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी उजनी धरणातून जिल्ह्याला त्वरित पाणी देण्याची आग्रही मागणी केली. तसेच, 'पीएम केअर' निधीतून खासदारांना मिळणाऱ्या 35 प्रकरणांची मर्यादा सर्वच लोकप्रतिनिधींसाठी वाढवून देण्याची विनंती त्यांनी केली. दुसरीकडे, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने तात्काळ मंजूर करावा, असा मुद्दा उपस्थित केला.

हेही वाचा – Hotel Raid: पंचतारांकित हॉटेलमधील गलिच्छपणा! 207 किलो बुरशी असलेल्या खराब भाज्या, 32 लिटर दूध आणि…

कर्करोग उपचार आणि नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेवर लक्ष वेधले

या चर्चेत अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कर्करोगासारख्या गंभीर आजारावरील उपचारांच्या सोयीसुविधा ग्रामीण भागात वाढवण्याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रलंबित असलेल्या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला गती देण्याची विनंती केली, तर वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनीही त्यांच्या परिसरातील विकासकामांची यादी मांडली. दिल्लीच्या राजकीय पटलावर झालेल्या या 15 मिनिटांच्या अनपेक्षित भेटीमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number