सतेज पाटलांनी मैदान मारलं, दिग्गजांना चितपट केलं; गोकुळ दूध संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सतेज पाटलांनी मैदान मारलं, दिग्गजांना चितपट केलं; गोकुळ दूध संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय
Gokul Election Result

कोल्हापूर : गोकुळ दूध संघ निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी सत्ता काबिज करून महायुतीला चितपट केले. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने 13 जागांवर विजय मिळवत महायुतीला धक्का दिला. महायुतीला 12 जागांवर समाधान मानावे लागले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली. गोकुळ दूध संघाची निवडणूक केवळ सहकारी संस्थेपुरती मर्यादित नव्हती. या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली होती. महायुतीने विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करण्यात आले. मात्र, मतमोजणीच्या विविध फेऱ्यांमध्ये समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी मिळविलेली आघाडी अखेर विजयात रूपांतरित झाली.

हेही वाचा : ‘शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर बेकायदेशीर कारवाई सहन करणार नाही…’; मुंबई उच्च न्यायालयाचं पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

शेतकरी समविचारी आघाडी (सतेज पाटील)

शशिकांत पाटील चुयेकर
अभिजित तायशेटे
विद्याधर गुरबे
सचिन घोरपडे
किसन चौगुले
बाबासाहेब देवकर
विश्वजित जाधव
राहुल देसाई
बाबासाहेब चौगुले
शशिकांत खोत, ओबीसी गट
राजू आवळे, अनुसूचित जाती गट
अंजना रेडेकर, महिला
भाग्यश्री डोंगळे, महिला गट
बयाजी शेळके, भटक्या विमुक्त

शेतकरी विकास आघाडी (महायुती)

चेतन नरके
वीरेंद्र मंडलिक
राहुल पाटील
अंबरिष घाटगे
अजित नरके
राजेश पाटील
रणजितसिंह के.पी. पाटील
रणजितसिंह दिलीप पाटील
अजित पाटील
युवराज पाटील
मदन देसाई

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number