Thursday, March 20, 2025 04:59:01 AM

नाशकात रामकुंड परिसरात कडेकोट बंदोबस्त

राज्यपाल सी. पी.राधाकृष्णन आज नाशिकमध्ये. राज्यपाल यांच्या हस्ते आज पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्रजीवन पुरस्काराचे वितरण व सायंकाळी राज्यपाल करणार गोदा आरती.

नाशकात रामकुंड परिसरात कडेकोट बंदोबस्त

नाशिक : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आज नाशिकच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते पंचवटीतील रामकुंड येथे राष्ट्रजीवन पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. तसेच, सायंकाळी राज्यपाल गोदावरी नदीच्या आरतीला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा:  Rose Day स्पेशल: प्रेमाचा गंध दरवळू द्या!

कोणते मार्ग असणार बंद? 

-ढिकले वाचनालय ते रामकुंड या दाेन्ही मार्गावर सर्वच वाहनांना ‘प्रवेश बंद’
-मालेगांव स्टॅण्ड ते रामकुंड या मार्गावरही ‘प्रवेश बंद’
-सरदार चौक ते रामकुंड हा मार्गही वाहतूकीस बंद
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

रामकुंडकडे जाणारे रस्ते बंद
राज्यपालांच्या दौऱ्यामुळे रामकुंडकडे जाणारे रस्ते दुपारी 12 ते रात्री 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

गोदा आरतीला भव्य आयोजन
सायंकाळी राज्यपालांच्या उपस्थितीत गोदावरी आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

पोलीस बंदोबस्त वाढवला
राज्यपालांच्या सुरक्षेसाठी रामकुंड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके काम करत असून, नागरिकांना गैरसोयी टाळण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री