हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रात; सोलापूर-विजयपूर महामार्गावर रास्तारोको

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेने रास्तारोको आंदोलन केले. कर्नाटकातील भाजप सरकारच्या निषेधार्थ प्रहार संघटनेने रास्तारोको आंदोलन केले असून पोलीस हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावरून वाद चिघळला असून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या पार्श्वभमीवर कर्नाटकमधील शाळा, महाविद्यालये तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तर […]

हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्रात; सोलापूर-विजयपूर महामार्गावर रास्तारोको

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेने रास्तारोको आंदोलन केले. कर्नाटकातील भाजप सरकारच्या निषेधार्थ प्रहार संघटनेने रास्तारोको आंदोलन केले असून पोलीस हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

कर्नाटकमध्ये हिजाब घालण्यावरून वाद चिघळला असून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे या पार्श्वभमीवर कर्नाटकमधील शाळा, महाविद्यालये तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. तर याप्रकरणाचे पडसाद कर्नाटकसह महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रहार संघटनेचा रास्तारोको आंदोलन करण्यात आले तर हिजाबच्या समर्थनार्थ एमआयएम पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. सोलापूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, आंदोलन कर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कर्नाटकमधील उडपी येथील कुंदापूर परिसरातील एका महाविद्यालयामध्ये काही मुल्सीम धर्माच्या मुलींनी हिजाब घातल्यांना त्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश नाकारला होता. तसेच हिजाब घातलेल्या मुलींना वेगळ्या खोलीत बसण्यात सांगितले. ज्या वेळी या मुली महाविद्यालयाने ठरवलेल्या पोशाखात येतील तेव्हाच त्यांना वर्गात बसण्याची परवानगी देण्यात यील. तसेच हिजाब घालण्याचा हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number