“मीनाक्षी शिंदेंचं प्रमाणपत्र कर्नाटकचं, मगं मान्य कसं झालं?” विशाखा राऊतांनी उचलला तो महत्त्वाचा मुद्दा; पूर्णेकर मृत्यूप्रकरणाला नवं वळण

ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांनी प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
Pradeep Purnekar case
Pradeep Purnekar case

ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि विशाखा राऊत यांनी प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी दोघींनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच दोघींनी देखील गंभीर आरोप केले आहेत. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या विशाखा राऊत यांनी धक्कादायक खुलासा केला.

विशाखा राऊत यांनी जात प्रमाणपत्राच्या वादाचा उल्लेख करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. माझे जात प्रमाणपत्र महाराष्ट्राचे होते, तर मीनाक्षी शिंदे यांचे प्रमाणपत्र कर्नाटकचे होते, मग ते कसं मान्य झालं असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणात प्रदीप पुर्णेकर पाठपुरावा करत होते, असंही राऊत म्हणाल्या. हत्येमागे हेच कारण आहे का, या दिशेने तपास सुरू असल्याचाही दावा विशाखा राऊत यांनी केला.

हेही वाचा- केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल? भाजपने जाहीर केली 8 राज्यसभा उमेदवारांची नावे; ‘या’ दोन केंद्रीय मंत्र्यांना वगळले

तर दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनी हल्ल्याच्या एक महिना आधीच त्यांनी काही शंका व्यक्त केल्याचा दावाही केला. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला, आरोपींना अटक झाली, मात्र आरोपपत्र कधी दाखल होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान या दोघींच्या आरोपानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे.

विशाखा राऊत म्हणाल्या की, “माझे जात प्रमाणपत्र महाराष्ट्राचे होते मिनाक्षी शिंदे यांचे प्रमाणपत्र कर्नाटकचे आहे. मग ते कसं चाललं … यांचा पाठ पुरावा प्रदिप पुर्णेकर करत होते. या हत्ये मागे हेच कारण आहे का याचा तपास सुरु आहे.”

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “प्रदिप पुर्णेकर हे आमचे विभागप्रमुख होते. ते आमच्या परीवारातील होत्या. 1 महिन्या पुर्वी शंका बोलून दाखवल्या होत्या. माझं काही बरं वाईट झालं तर याबाबत त्यांना काही नावं सांगितली होती. FIR झाली आरोपी अटक झाले पण आरोपपत्र कधी? या मध्ये राजकीय सुतोवाच झालाय. या गल्लीत असा हल्ला केलाय ज्यामुळे इतरांना काही झालं असतं तर?”

हेही वाचा- बुलढाण्यात रक्तरंजित थरार! शिंदेसेनेत आणि अजित पवार गटात तुंबळ हाणामारी; दोघांचा मृत्यू

दरम्यान शिवसेना (उबाठा) गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. तसेच, चौकशीसाठी दोन महिलांसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version