भारत आणि पाकिस्तान तात्काळ युद्धबंदीसाठी तयार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एक्सवर एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये ट्रम्प म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान तात्काळ युद्धबंदीसाठी तयार; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी एक्सवर एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामध्ये ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ, रात्रभर चाललेल्या वाटाघाटीनंतर, मला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. सामान्य ज्ञान आणि चांगली बुद्धिमत्ता वापरल्याबद्दल दोन्ही देशांचे मी अभिनंदन करतो’.

हेही वाचा: भारत-पाक युद्धाशी आमचा संबंध नाही; अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष जे.डी.व्हान्स यांचं वक्तव्य

भारत सरकारने देखील दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी असल्याची पुष्टी केली आहे. यादरम्यान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, ‘पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (PAK DGMO) शनिवारी दुपारी 3:35 वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना (INDIA DGMO) फोन केले होते. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी 5 वाजल्यापासून दोन्ही बाजूंनी जमीन, वायू आणि समुद्रमार्गावरून सुरू असलेल्या सर्व गोळीबारांना आणि लष्करी कारवायांना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी, दोन्ही पक्षांना या कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 12 मे रोजी दुपारी 12 वाजता डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स पुन्हा बोलतील.’

हेही वाचा: उद्योगमंत्री उदय सामंतांनी घेतली शहीद मुरली नाईक कुटुंबियांची भेट

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनीही एक्सद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाल्याची घोषणा केली. एक्सवर पोस्ट करत मंत्री इशाक दार म्हणाले की, ‘पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर आपली सहमती दर्शविली आहे. पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत’.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number