Sanjay Raut VS Navnath Ban: ‘संकटमोचकांचे काम फक्त आमदार पळवणेच आहे का?’ संजय राऊतांच्या टिकेला नवनाथ बन यांच्याकडून प्रत्युत्तर:; म्हणाले…

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे नेते केवळ फोडाफोडीच्या राजकारणात मग्न असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

Sanjay Raut VS Navnath Ban: ‘संकटमोचकांचे काम फक्त आमदार पळवणेच आहे का?’ संजय राऊतांच्या टिकेला नवनाथ बन यांच्याकडून प्रत्युत्तर:; म्हणाले…

Sanjay Raut VS Navnath Ban: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला की, 24 तास राजकारण करणारे लोक संकटाच्या काळात कुठे गायब होतात? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना राऊत म्हणाले की, “राजकारणात संकटे येतात, पण स्वतःला ‘संकटमोचक’ म्हणवून घेणाऱ्यांचे काम फक्त आमदार आणि नगरसेवक पळवणे हेच आहे का?” शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे नेते केवळ फोडाफोडीच्या राजकारणात मग्न असल्याचा आरोप राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे लवकरच शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

“महाविकास आघाडीने घरात बसून कारभार केला;” नवनाथ बन यांचे जशास तसे उत्तर
संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नवनाथ बन यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील उणिवांवर बोट ठेवले. बन म्हणाले की, “हे सरकार अत्यंत संवेदनशील आहे. पुढील 3 वर्षे कोणतीही निवडणूक नसतानाही केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.” महाविकास आघाडीवर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, आघाडी सरकारने केवळ आश्वासने दिली आणि ‘बांधावर जाऊ’ असे म्हणून प्रत्यक्षात मातोश्रीवर किंवा घरामध्ये बसूनच कारभार केला. याउलट सध्याचे महायुती सरकार हे प्रत्यक्ष कृती करणारे सरकार असून आघाडीचे सरकार पूर्णपणे असंवेदनशील होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – Bacchu Kadu: अमरावती राजकारणात खळबळ; बच्चू कडू यांच्यावर खुनाचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शेतकरी कर्जमाफी आणि बांधावरचे राजकारण
राज्यातील राजकीय वातावरण सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून तापले आहे. एकीकडे संजय राऊत यांनी सत्ताधारी नेत्यांना केवळ ‘आमदार पळवणारे’ म्हणून हिणवले आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी गटाने आघाडीच्या नेत्यांना ‘घरात बसून राहणारे’ म्हणून लक्ष्य केले आहे. आगामी काळात उद्धव ठाकरे यांचा नियोजित बांधावरचा दौरा आणि सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा अधिकच रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचा दावा दोन्ही बाजूंकडून केला जात असला तरी, प्रत्यक्ष मदत कोणाकडून मिळते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number