मी धार्मिक कार्यक्रमांना जात नाही हे अर्धसत्य; शरद पवारांचं स्पष्टीकरण

माझ्याबद्दल अर्धसत्य सांगितले जाते. मात्र, मी लहानपणापासूनच पूजा करतो. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा तीन ते चार वेळा पांडुरंगाची पूजा केली होती. असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केले.

मी धार्मिक कार्यक्रमांना जात नाही हे अर्धसत्य; शरद पवारांचं स्पष्टीकरण

मुंबई: 'माझ्याबद्दल अर्धसत्य सांगितले जाते. मात्र, मी लहानपणापासूनच पूजा करतो. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा तीन ते चार वेळा पांडुरंगाची पूजा केली होती. त्यासोबतच, मी तुळजापूरला देखील जाऊन पूजा करतो', असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठाण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

बुधवारी, ठाणे येथील पाचपाखाडी भागातील गणेशवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी तुळजाभवानीचे मंदिर उभारले आहे. या मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते करण्यात आली होती. या कार्यक्रमानंतर, शरद पवार यांनी प्रसारमाध्यांसोबत संवाद साधला. या दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख आणि शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर देखील उपस्थित होते.

हेही वाचा: माजी आमदार रामदास आंबटकर यांचं दुःखद निधन

मी धार्मिक कार्यक्रमांना जात नाही, हे अर्धसत्य:

प्रसारमाध्यमांसोबत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवारांनी स्पष्टीकरण देत म्हणाले की, 'मी अशा कार्यक्रमांना जात नाही, असे अर्धसत्य सांगितले जाते. मात्र, मी लहानपणापासूनच देवाची पूजा करतो, त्यांची आराधना करतो. जेव्हा मी राज्यात मुख्यमंत्री होतो, तेव्हा मी पांडुरंगाची पूजा करण्यासाठी पंढरपूरला तीन ते चार वेळा गेलो आहे. त्यासोबतच, मी तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीची पूजा करतो. त्यामुळे मी अशा कार्यक्रमांना जात नाही, असं जे काही सांगितलं जातं ते अर्धसत्य आहे'.

मंदिर सर्वांसाठी खुले झाल्याची शरद पवारांची घोषणा:

देशातील 51 शक्तिपीठांपैकी एक आणि राज्यातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराची ओळख आहे. ठाणेमध्ये या शक्तीपीठाचे एक रूप साकारण्यात आले आहे. ठाणे येथील पाचपाखाडी भागामध्ये तुळजापूर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. बुधवारी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते या मंदिरातील तुळजाभवानी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ही पूजा दीड तासांपासून सुरू होती. ही पूजा झाल्यानंतर, 'ठाण्यामधील हे मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येत आहे,' अशी घोषणा ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number