Ajit Pawar: सरकारचा ऐतिहासिक निर्णय; दिवंगत अजितदादांचा ‘राष्ट्रपुरुषां’च्या यादीत समावेश, ‘या’ तारखेला साजरी होणार पहिली शासकीय जयंती

राज्याचे दिवंगत नेते अजित अनंतराव पवार यांच्या स्मृतीला राज्य सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक बहुमान दिला आहे.

Ajit Pawar: सरकारचा ऐतिहासिक निर्णय; दिवंगत अजितदादांचा ‘राष्ट्रपुरुषां’च्या यादीत समावेश, ‘या’ तारखेला साजरी होणार पहिली शासकीय जयंती

Ajit Pawar: महाराष्ट्राच्या विकासात आणि प्रशासनात आपले अमिट योगदान देणारे राज्याचे दिवंगत नेते अजित अनंतराव पवार यांच्या स्मृतीला राज्य सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक बहुमान दिला आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 15 जुलै, 2026 रोजी जारी केलेल्या एका विशेष परिपत्रकानुसार (GR), माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश आता राज्यातील अधिकृत राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या यादीत करण्यात आला आहे. त्यानुसार, दरवर्षी 22 जुलै रोजी शासकीय पातळीवर त्यांची जयंती साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी लाडक्या नेत्याच्या सन्मानार्थ मुख्यमंत्री आणि प्रशासनाकडे ही आग्रही मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला असून, 22 जुलै रोजी राज्यभरात प्रथमच शासकीय स्तरावर ही जयंती साजरी केली जाईल. 

या दिवशी मंत्रालयापासून ते सर्व निमशासकीय कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा-महाविद्यालयांमध्ये दिवंगत अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना शासकीय मानवंदना दिली जाईल. या निमित्ताने शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रशासनावरील पकड आणि लोकसेवेचा ऐतिहासिक गौरव

उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि जलसंपदामंत्री यांसारख्या अत्यंत जबाबदार पदांवर काम करताना अजितदादांनी निर्माण केलेला प्रशासनाचा दबदबा आणि पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची त्यांची अनोखी कार्यपद्धती अवघ्या महाराष्ट्राने अनुभवली आहे. 

हेही वाचा – Vinayak Raut : विनायक राऊत यांना कधीही अटक होण्याची शक्यता; तपासातील नव्या घडामोडींनी राजकीय वर्तुळात खळबळ

'दिलेला शब्द पाळणारा खंबीर नेता' अशी ओळख असलेल्या दादांचे 28 जानेवारी रोजी झालेल्या एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असली, तरी त्यांच्या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे त्यांच्या लोकसेवेचा आणि गतिमान प्रशासनाचा शासकीय स्तरावर केलेला सर्वोच्च सन्मान मानला जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number