महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दुपारी 12.30 वाजता या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. या निवडणुकीतून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली आहे. मात्र कॉंग्रेस अजूनही या लढतीत आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे.
पुढे त्यांनी लिहिले की, “परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो! तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल..!”, असं रोहित पवारांनी लिहिलं आहे,
बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य… pic.twitter.com/wUXsMsQusF — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2026