वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांच्या सोबतच्या भेटींबाबत सूचक विधान केले. त्याचप्रमाणे मनसैनिकांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कानमंत्र दिला. मुख्यमंत्रीपदासाठी किती लाचारी, चाटुगिरी कारावी, असे म्हणत एकनाथ शिंदेंना लक्ष्यही केलं.
हेही वाचा - 'आता उठणं बसणं सुरूच राहणार...'; राज ठाकरेंकडून युती बाबत सूचक वक्तव्य
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकार काही टुरिझम पाँईट काढत आहेत. रायगड, शिवनेरी, राजगडावर पर्यटनाची नमो टुरिझम सेंटर काढत आहे. आमच्या महाराजांच्या किल्ल्यांवर, जिथं फक्त महाराजांचंच नाव हवं तिथं, हे उभं केलं जात आहे. मी आत्ताच सांगतो उभं केलं की फोडून टाकणार.