विधान भवनात बॉम्ब ठेवण्यात आल्याची घटना समोर आली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी तपास घेण्यास सुरूवात केली. यावेळी विधानभवनातील सर्व कर्मचाऱ्यांना विधानभवनाबाहेर काढले गेले. घटनास्थळी श्वानपथकासह तपासणी करण्यात येत आहे. अशातच आता राहुल नार्वेकर यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, “विधानभवनातील बॉम्ब धमकीच्या पार्श्वभूमीवर आजचे कामकाज स्थगित करून संपूर्ण वास्तूची कसून तपासणी करावी. पोलीस यंत्रणेवरील ताण लक्षात घेता, अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवावा, ही नम्र विनंती!”
राहुल नार्वेकरांच्या या मागणीमुळे विधानभवनाचे कामकाज आज स्थगित होणार का? तसेच एक दिवस वाढवून मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानभवनातील बॉम्ब धमकीच्या पार्श्वभूमीवर आजचे कामकाज स्थगित करून संपूर्ण वास्तूची कसून तपासणी करावी. पोलीस यंत्रणेवरील ताण लक्षात घेता, अधिवेशनाचा कालावधी एक दिवसाने वाढवावा, ही नम्र विनंती!@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @DGPMaharashtra… — Milind Narvekar (@NarvekarMilind_) March 12, 2026