दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 126 भाजप नगरसेवकांचा मोठा निर्णय; 1 वर्षाचं मानधन देणार मुख्यमंत्री सहायता निधीला

महापालिकेतील भाजपच्या सर्व 126 नगरसेवकांनी आपले संपूर्ण एक वर्षाचे मानधन दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी 126 भाजप नगरसेवकांचा मोठा निर्णय; 1 वर्षाचं मानधन देणार मुख्यमंत्री सहायता निधीला
BJP corporators salary donation

राज्यातील दुष्काळग्रस्त भागात संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी पुणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. महापालिकेतील भाजपच्या सर्व 126 नगरसेवकांनी आपले संपूर्ण एक वर्षाचे मानधन दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या मुख्य सभेत यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला. या निर्णयामुळे ऐन सणासुदीच्या काळात संकटात सापडलेल्या बळीराजाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय पाठिंब्याची घाटे यांची अपेक्षा

दरम्यान, यासंदर्भात सविस्तर माहिती देताना धीरज घाटे यांनी महापालिकेतील इतर सर्व राजकीय पक्षांनीही या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हायला हवे होते, अशी भावना व्यक्त केली. बळीराजाचा प्रश्न हा कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण समाजाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे सभागृहातील सर्वच नगरसेवकांनी दलबदल आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत मदतीचा हात पुढे करायला हवा होता, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दुर्दैवाने विरोधी व इतर नगरसेवकांनी या प्रस्तावात सहभाग नोंदवला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली, परंतु भाजपने आपल्या स्तरावर ही सामाजिक जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचा संकल्प केला आहे.

हेही वाचा – कोल्हापूर ‘गोकुळ’ दूध संघ निवडणुकीत 99.96 टक्के विक्रमी मतदान; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, उद्या होणार फैसला

शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्याचे नियोजन

तथापी, दुष्काळाच्या दाहकतेमुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजप नगरसेवकांच्या एक वर्षाच्या मानधनाची एकत्रित रक्कम लवकरात लवकर संकलित केली जात आहे. येणाऱ्या दिवाळीच्या सणापूर्वी ही आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल, असा दृढ विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. पुणे महापालिकेतील या ऐतिहासिक आणि संवेदनशील निर्णयाचे सर्व स्तरांमधून स्वागत होत असून, यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळण्यास मदत होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number