श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या लोकनेते विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल आहे. या निवडणुकीत 21 उमेदवार उभे होते त्यापैकी सर्वच्या सर्व 21 उमेदवार बहुमताने विजयी झाले आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती त्यांना त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार आणि बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांचे आव्हान होते. तीन पॅनेल आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीत आपापल्या परीने ताकद लावली असून सोमेश्वर कारखान्याच्या सत्तेची सूत्रे कोणाकडे जाणार, याकडे सभासदांसह बारामती, पुरंदर, खंडाळा व फलटण तालुक्यांतील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.
या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधकांचा सुपडा साफ करून सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पॅनलचे सर्व सर्व 21 उमेदवार निवडून आले आहेत. तर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले होते. मात्र युगेंद्र पवार यांच्या पॅनलमधील एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. त्यांना या पॅनलला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.
तर दुसरीकडे सोमेश्वरच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांचा देखील दारुण पराभव झाला. दरम्यान अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांची ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांच्यासह सर्वच विरोधकांचा सुपडा साफ करून बारामतीवर आपलंच निर्विवाद वर्चस्व असल्याचं सिद्ध केलं आहे.
सुनेत्रा पवारांच्या सर्व विजयी 21 उमेदवारांची यादी वाचा
गट क्रमांक 1 – निंबूत खंडाळा
अभिजीत काकडे- निंबुत
प्रमोद भगवानराव काकडे- निंबुत
डॉ. वसंतराव दगडे- नीरा शिवतकार
शैलेश रासकर- खंडोबाची वाडी
अशोक धायगुडे- अंदोरी
गट क्रमांक 2. मुरुम वाल्हा
विक्रम भोसले- वाणेवाडी
ऋषीकेश गायकवाज- करंजे पूल
राजवर्धन शिंदे- मुरुम
संग्राम सोरटे- सोरटेवाडी
गट 3 – होळ मोरगाव
रविंद्र भापकर- लोणी भापकर
मकरंद सस्ते- सस्तेवाडी
मनिषा होळकर- सदोबाची वाडी
द्वारकोजी साळवे- वडगाव नि
गट क्रमांक 4 को-हाळे सुपा
राजेंद्र बोरकर- बोरकरवाडी
अक्षय खलाटे- माळवाडी लाटे
सुनील भगत- को- हाळे बु.
प्रणिता खोमणे- कोऱ्हाळे खु.
गट 5 – मांडकी जवळार्जुन
सतिश जगताप- मांडकी
सुधाकर टेकवडे- जवळार्जुन
उत्तम धुमाळ- जेऊर
छबुबाई नाझिरकर- नाझरे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.