Ladki Bahin Yojana : मार्च-एप्रिलचे हप्ते थकले, लाडक्या बहिणी चिंतेत; उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर बोलताना उदय सामंत यांनी लाडक्या बहिणींना आश्वस्त केलं.

Ladki Bahin Yojana : मार्च-एप्रिलचे हप्ते थकले, लाडक्या बहिणी चिंतेत; उदय सामंत नेमकं काय म्हणाले?

Ladki Bahin Yojana: मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते न मिळाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यावर बोलताना उदय सामंत यांनी आश्वस्त केले की, ‘निधी वितरणाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा केली जाईल. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे की, तांत्रिक आणि निधीचा प्रश्न सुटताच थकीत हप्ते महिलांच्या खात्यात जमा केले जातील,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्रातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या हिंदी भाषेच्या परीक्षेवरून सुरू झालेला वाद अखेर शांत झाला आहे. विविध राजकीय संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्य सरकारने या परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच, प्रलंबित असलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्यांबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

हिंदी भाषेचा वाद आणि सरकारची माघार
राज्य सरकारने 28 जून रोजी राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, “महाराष्ट्रात मराठी असताना हिंदीची सक्ती का?” असा सवाल करत शिवसेना (ठाकरे गट), मनसे आणि इतर संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. मराठी विरुद्ध हिंदी असा भाषावाद उफाळण्याची चिन्हे दिसताच सरकारने नमती भूमिका घेतली.

हेही वाचा – Sandeep Deshpande : मराठीच्या सन्मानासाठी मनसे मैदानात! हिंदी सक्तीवरून संदीप देशपांडे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

मंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
या निर्णयाबाबत माहिती देताना मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, “माध्यमांतून या परीक्षेबाबत समजताच मी प्रधान सचिवांकडे विचारणा केली. सध्या या परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. भविष्यात ही परीक्षा खरोखरच आवश्यक आहे का, याची मी स्वतः पडताळणी करेन. गरज वाटली तरच विचार होईल, अन्यथा ही परीक्षा घेतली जाणार नाही.”
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number