Wednesday, July 09, 2025 10:14:33 PM

'शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी...' - मंत्री गुलाबराव पाटील

नुकताच, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी -  मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई: नुकताच, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे, ज्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 'शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊतांनीच एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता', असं खळबळजनक विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. 

हेही वाचा: कोट्यवधींचं डांबरीकरण निकृष्ट दर्जाचं; संतप्त ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा

नेमकं प्रकरण काय?

प्रसार माध्यमांतून खासदार संजय राऊत सतत ठाकरे पक्षाची बाजू मांडत असतात. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना राऊत 'गद्दार' म्हणतात. मात्र, संजय राऊतांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी खळबळजनक विधान केले. 'संजय राऊत हेच सर्वात आधी फुटणार होते. शिवसेना हायजॅक करायचा प्रस्ताव संजय राऊतांनीच अगोदर मांडला होता. मात्र, तेव्हा ते थांबले होते', असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यासह, महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य शहाजी बापू पाटील यांनीही म्हटले की, 'जेव्हा शिवसेना फुटली होती, तेव्हा सर्वप्रथम ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत फुटणार होते. मात्र 35 ते 36 आमदारांनी त्यांना विरोध केला होता'.

राज्यात शिवसेना पक्षात फूट पडून 3 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. मागील 3 वर्षांपासून दोन्ही शिवसेना पक्षांचे नेते एकमेकांवर टीकेचा वर्षाव करत आहेत. पूर्वी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत सर्वांनी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहिला. सध्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही असाच सामना होणार आहे.


सम्बन्धित सामग्री