Raj Thackeray and Uddhav Thackeray: तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार…, मनसेच्या संदीप देशपांडेंचा भाजपाला टोला

तुमचा बेपारी  ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही, जय महाराष्ट्र, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. यावर ट्विटवर आता भाजपा नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचेे लक्ष लागले आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: तुमचा बेपारी ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार…, मनसेच्या संदीप देशपांडेंचा भाजपाला टोला

Raj Thackeray and Uddhav Thackeray: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार हे जवळपास स्पष्ट झाल्यावर भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षात शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड फेल झाला. बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ब्रँड नाहीत, अशी बोचरी टीका भाजपाच्या नेत्यांकडून अलीकडच्या काळात सातत्याने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करुन भाजपाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे हा ब्रँड  नाही विचार आहे. ब्रँड हा बेपारी लोक उभा करतात तर विचार हा संघर्षातून उभ्या झालेल्या चळवळीतून निर्माण होतो. पैसे ओतून ब्रँड तयार करता येतो पण चळवळ नाही.पैसे संपले की ब्रँड संपतो पण विचार नाही. तुमचा बेपारी  ब्रँड संपणार पण आमचा मराठी ठाकरे विचार नाही, जय महाराष्ट्र, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. यावर ट्विटवर आता भाजपा नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे सर्वांचेे लक्ष लागले आहे.

 

हेही वाचा: Asia Cup 2025 : भारत-पाक सामना आणि संजय राऊतांची केंद्र-बीसीसीआयवर टीका

दरम्यान, काही दिवसांपासून भाजपाने संदीप देशपांडे यांच्या दादरमधील ‘इंदुरी चाट’ या हॉटेलवरुन त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या हॉटेलमध्ये मराठी आचारी नाही, परप्रांतीय आचारी आहे, असा मुद्दा पुढे करत भाजपाने संदीप देशपांडे यांना जोरदार घेरले आहे. या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय. नाव देवनागरीत लिहिलं म्हणून मराठीपण? यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी ठेवता येत नाही, आणि हे मराठी महापौराच्या गप्पा मारत आहेत. महापौर मराठीच होणार, पण महायुतीचा आणि हिंदुत्ववादी विचारांचा, असे भाजपने म्हटले होते. संदीप देशपांडे यांनी या टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले होते की, “इंदुरी चाटवरून मला ट्रोल करणाऱ्यांना इतिहास माहित नाही. मराठे इंदूर भागात गेले, तिथे त्यांनी स्थानिक पदार्थांवर आपला प्रभाव टाकला. तेच पदार्थ पुढे ‘इंदुरी फूड’ या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांना इतिहास माहित नाही. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची ही दिवाळखोरी आहे”, असे प्रत्युत्तर संदीप देशपांडे यांनी दिले होते.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number