कोल्हापुरात ‘या’ ठिकाणी मटण स्वस्त दरात

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो तांबडा-पांढरा. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मटणाचे दर वाढले आहेत. या वाढलेल्या मटणाच्या दरावर कोल्हापुरकरांनी तोडगा काढला आहे. मटणाच्या वाढलेल्या दरामुळे कोल्हापुरकर मटणापासून वंचित राहू नये म्हणून कोल्हापुरकरांनी पुढाकार घेतला आहे. स्थानिकांनी स्वत: बकरी खरेदी करुन कोल्हापुरकरांची स्वस्तात मटणाची सोय केली आहे. राजारामपूरीत 425 रुपयाला एक किलो […]

कोल्हापुरात ‘या’ ठिकाणी मटण स्वस्त दरात

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो तांबडा-पांढरा. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मटणाचे दर वाढले आहेत. या वाढलेल्या मटणाच्या दरावर कोल्हापुरकरांनी तोडगा काढला आहे. मटणाच्या वाढलेल्या दरामुळे कोल्हापुरकर मटणापासून वंचित राहू नये म्हणून कोल्हापुरकरांनी पुढाकार घेतला आहे.

स्थानिकांनी स्वत: बकरी खरेदी करुन कोल्हापुरकरांची स्वस्तात मटणाची सोय केली आहे. राजारामपूरीत 425 रुपयाला एक किलो मटण मिळत आहे. स्वस्तात मटण मिळत असल्यामुळे या ठिकाणी कोल्हापुरकरांनी मटण घेण्यासाठी एकच गर्दी केली आहे.

कोल्हापुरात इतर ठिकाणी एक किलो मटणासाठी 600 रुपये मोजावे लागत आहेत. पण राजारामपुरीत स्वस्तात मटण मिळत असल्याने कोल्हापुरकरांचा रविवार मात्र गाजणार इतकं नक्कीच.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number