लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! योजनेबाबत एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; नेमकं काय म्हणाले?

Eknath Shinde : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! योजनेबाबत एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं; नेमकं काय म्हणाले?
Ladki bahin yojana

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज अमरावती दौरा झाला. अमरावती शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारार्थ त्यांनी झंझावाती सभाही घेतली होती.अमरावतीमध्ये अनेक उमेदवार हे रिंगणात असल्याने या लढतीकडे महायुतीचे विशेष लक्ष आहे.

किरण सरनाईक यांच्या विजयासाठी शिंदे यांनी रणनीती आखत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन केले होते. याच वेळी बोल असताना शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांना टोला लगावला. ”महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात असलेलं सरकार आणलं, लाडक्या बहिणींची योजना जी सुरु केली, ती आजही सुरु आहे. कोणी माइका लाल आला तरी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही जे बोलतो ते करतोच,म्हणूनच लोक आमच्याबरोबर आहेत,”असे शिंदे म्हणाले.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number