Andheri Subway Mumbai Rain: पहिल्याच पावसात BMC ची पोलखोल, अमित साटम वापरणार ‘ठाकरे पॅटर्न’, काय आहे फॉर्म्युला?

राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून मुंबईत काल जोरदार पावसाची हजेरी लागली होती. मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सब-वे पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले, यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

Andheri Subway Mumbai Rain: पहिल्याच पावसात BMC ची पोलखोल, अमित साटम वापरणार ‘ठाकरे पॅटर्न’, काय आहे फॉर्म्युला?

राज्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असून मुंबईत काल जोरदार पावसाची हजेरी लागली होती. मान्सूनपूर्व पावसातच अंधेरी सब-वे पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले, यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या समस्येच्या उपाययोजनांवर बीएमसीमध्ये पुन्हा चर्चा होत असल्याचे चित्र समोर आहे.

अंधेरी परिसरात 3 मोठ्या भूमिगत पाणी साठवण टाक्या उभारण्याचा महापालिकेचा विचार आहे. यात सुमारे 41 हजार घनमीटर पाणी साठवण क्षमता असेल तसेच यासाठी 500 कोटी खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाबाबत भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली.

हेही वाचा- Massive Fire At Hospital : दिल्लीतील हॉटेलनंतर आज पहाटे रुग्णालयात भीषण आग; 10 जणांचा होरपळून मृत्यू, 20 जण जखमी

विशेष म्हणजे, हाच मॉडेल हिंदमाता परिसरात तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला होता. हिंदमात्यातील पूरस्थिती कमी करण्यासाठी उभारलेल्या भूमिगत टाक्यांना यशस्वी प्रयोग मानले जाते. आदित्य ठाकरेंच्या अनेक प्रकल्पांवर टीका करणाऱ्या भाजपकडून आता त्याच सूत्राचा स्वीकार होत असल्याची चर्चा सुरु आहे.

2023 मध्ये 21, 2024 मध्ये 25 आणि 2025 मध्ये 22 वेळा अंधेरी सब-वे पाण्याखाली गेला होता. अंधेरी परिसरात काल सकाळी रिमझिम पाऊस सुरु होता. त्याच पावसात अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याचं दिसलं. सबवे परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ बाजूलाच काढून ठेवल्याने एका सरीतच पूल पाण्याखाली गेला. दरम्यान, आता अंधेरी सबवेची वाहतूक सुरळीत असून पहिल्याच पावसात मात्र नालेसफाईची पोलखोल समोर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number