देशभरात विजयादशमी उत्साहात साजरी; पंतप्रधान मोदींनी पटपडगंजमध्ये तर राष्ट्रपती मुर्मू यांनी द्वारकेत केलं रावणाच्या पुतळ्या दहन

राजधानी दिल्लीमध्ये पार पडलेल्या विविध भव्य रामलीला सोहळ्यांमध्ये प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाच्या जिवंत सादरीकरणानंतर रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या महाकाय पुतळ्यांचे नेत्रदीपक फटाक्यांच्या आतषबाजीसह दहन करण्यात आले.

देशभरात विजयादशमी उत्साहात साजरी; पंतप्रधान मोदींनी पटपडगंजमध्ये तर राष्ट्रपती मुर्मू यांनी द्वारकेत केलं रावणाच्या पुतळ्या दहन
Pm Modi performed burning of effigy of Ravana in Patparganj

अधर्मावर धर्माचा आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक असलेला पवित्र सण ‘विजयादशमी’ (दसरा) मंगळवारी राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात अत्यंत उत्साहात आणि मांगल्यात साजरा करण्यात आला. राजधानी दिल्लीमध्ये पार पडलेल्या विविध भव्य रामलीला सोहळ्यांमध्ये प्रभू श्रीराम आणि रावण यांच्यातील युद्धाच्या जिवंत सादरीकरणानंतर रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या महाकाय पुतळ्यांचे नेत्रदीपक फटाक्यांच्या आतषबाजीसह दहन करण्यात आले. या राष्ट्रीय महोत्सवात देशाचे सर्वोच्च नेतृत्व असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्रपणे हजेरी लावत जनतेला विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

द्वारकेत 221 फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी द्वारका सेक्टर-10 मधील ‘द्वारका श्री रामलीला सोसायटी’तर्फे आयोजित विजयादशमी उत्सवात आवर्जून सहभाग घेतला. यायप्रसंगी दिल्लीतील सर्वात मोठे आकर्षण ठरलेला तब्बल 221 फूट उंच रावणाचा महाकाय पुतळा उपस्थितांसमोर जाळण्यात आला. उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, दसऱ्याच्या या पावन पर्वावर देश-विदेशात आयोजित रामलीलांच्या माध्यमातून लाखो नागरिक प्रभू श्रीरामांच्या पवित्र जीवनचरित्राचे आणि उदात्त मूल्यांचे स्मरण करतात. भगवान रामाचे आदर्श जीवन आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच खरी विजयादशमी असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘सुशासन आणि रामराज्य’ हीच देशाची प्रेरणा; पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व दिल्लीतील पटपडगंज येथील ‘आयपी एक्स्टेंशन उत्सव मैदाना’वर आयोजित रामलीला उत्सवात सहभाग घेत रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, प्रभू श्रीरामांचे जीवन हे केवळ धार्मिक श्रद्धा नसून ते ‘सुशासना’चा भक्कम पाया आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात प्रभू रामांचे विचार आणि संस्कृती रुजलेली आहे. ‘रामराज्य’ म्हणजे अशी शासनव्यवस्था जिथे कोणताही भेदभाव न करता प्रत्येक नागरिकाला समान न्याय व संधी मिळते. सत्तेचा मूळ उद्देश केवळ राज्य चालवणे नसून सर्वसामान्य जनतेचे कल्याण सुनिश्चित करणे हा असतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –दलेर मेहंदी मद्यधुंद अवस्थेत…, धड बोलताही येईना…, भर कार्यक्रमात मंत्र्यांचा पारा चढला; सर्वांसमोर फटकारलं, म्हणाले…

गोस्वामी तुलसीदास यांच्या काव्यपंक्तींचा संदर्भ देत पंतप्रधानांनी सांगितले की, रामराज्यात कोणालाही दुःखाचा त्रास होत नाही. आपण नेहमी ‘नागरिक देवो भव’ या मंत्राचे पालन केले पाहिजे आणि गरीब, वंचित घटकांच्या सेवेला आपले सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. या भव्य सोहळ्यामुळे राजधानीतील वातावरण देशभक्ती आणि उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाले होते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number