Monday, November 17, 2025 12:25:50 AM

Maharashtra Olympic Associaction Election : मोठी जबाबदारी, अध्यक्षपदाची धुरा आता अजित पवारांकडे

यासाठी अजितदादांचा गट आपल्या भाजपा या मित्रपक्षाशी चर्चा करत होता.

maharashtra olympic associaction election  मोठी जबाबदारी अध्यक्षपदाची धुरा आता अजित पवारांकडे

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्षपदासाठी निवडणुका मोठ्या प्रमाणात चर्चेत होत्या. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा सुरु होती. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते. यासाठी अजितदादांचा गट आपल्या भाजपा या मित्रपक्षाशी चर्चा करत होता. 

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशनचे(MOA) अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली आहे.  त्यांच्या पॅनेलमधील आदिल सुमारिवाला, प्रदीप गंधे आणि प्रशांत देशपांडे यांची उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक न होता त्या पदावर विराजमान झाले.

हेही वाचा - Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर, 'या' तारखेला होणार निवडणुका 

समोर आलेल्या माहितीनुसार, मोहोळ यांनी अध्यक्षपदासाठीचा अर्ज मागे घेतला. या निवडणुकीतून अजितदादा अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ते क्रीडा पायाभूत सुविधा, खेळाडू कल्याण आणि पारदर्शकतेसाठी पुढील दोन वर्षे काम करणार आहेत.याआधीही ऑलिम्पिक असोशिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा अजित पवार यांच्याकडेच होती.


सम्बन्धित सामग्री