दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीचं आक्रमक आंदोलन; पोलिसांच्या वर्तनावर प्रियंका गांधींचा मारहाणीचा आरोप

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत कालपासून सुरू झालेल्या या आंदोलनाने आज अत्यंत आक्रमक रूप धारण केले
दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीचं आक्रमक आंदोलन; पोलिसांच्या वर्तनावर प्रियंका गांधींचा मारहाणीचा आरोप
Priyanka Gandhi police assault allegation

नवी दिल्लीतील जंतरमंतर परिसरात विरोधी पक्षांच्या (इंडिया आघाडी) तीव्र विरोध प्रदर्शन आणि निदर्शनांमुळे कमालीचा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करत कालपासून सुरू झालेल्या या आंदोलनाने आज अत्यंत आक्रमक रूप धारण केले. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या थेट नेतृत्वाखाली शेकडो खासदार आणि कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी करत जंतरमंतरच्या दिशेने मार्च काढला. मतचोरीचे आरोप करत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार घेणार नाही, असा स्पष्ट इशारा विरोधकांनी यावेळी दिला.

प्रियंका गांधींचे रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन; दिल्ली पोलिसांची उडाली धांदल

आंदोलकांना आणि खासदारांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरकडे जाणारी बस मध्येच अडवून धरली. पोलिसांच्या या कारवाईचा विरोध करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी रस्त्यावरच झोपून अनपेक्षितपणे ठिय्या आंदोलन सुरू केले. प्रियंका गांधी यांच्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची मोठी धांदल उडाली आणि जंतरमंतर परिसरातील वातावरण अधिकच चिघळले. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – EVM ला विरोध, पण बॅलेट पेपरवर मतदान होऊनही काँग्रेसचा दरुण पराभव; 42 पैकी तब्बल 32 जागांवर भाजपचा दणदणीत विजय

“लोकप्रतिनिधींना मारहाण आणि गैरवर्तन;” प्रियंका गांधींचे गंभीर आरोप

रस्त्यावरील ठिय्या आंदोलनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना प्रियंका गांधी यांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अत्यंत तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. शांततापूर्ण मार्गाने लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि खासदारांना पोलिसांनी अमानुषपणे धक्काबुक्की व मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पोलिसांकडून महिला व ज्येष्ठ खासदारांशी अत्यंत गैरव्यवहार करण्यात आल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. या घटनेनंतर दिल्लीतील राजकीय वातावरण प्रचंड तापले असून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version