लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना थेट केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना लक्ष्य केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना त्यांच्या पदावरून तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत निवडणूक आयुक्तांना हटवले जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करत राहुल गांधींनी “मोदीजींना सांगा की आरोपी क्रमांक 4 ज्ञानेश कुमार यांना हटवा, आंदोलन अवघ्या 30 सेकंदात संपेल,” असा रोखठोक इशारा सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.
दिवाळीच्या हंगामात 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानीची शक्यता
राहुल गांधींच्या या भूमिकेनंतर दिल्लीतील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापारी संघटना ‘चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री’ (CTI) ने राहुल गांधी आणि काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहून दिवाळीच्या ऐन हंगामात रॅलीमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानाकडे लक्ष वेधले आहे. 24 ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या पत्रात CTI ने म्हटले आहे की, आंदोलने आणि रॅलींमुळे आधीच ऑक्टोबर महिन्यात दिल्लीतील व्यापाऱ्यांचे सुमारे 3,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जर राजधानीत रस्ते सील केले गेले आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली, तर हा आकडा थेट 10,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचू शकतो, अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
To every trader in Delhi: We love you and hear you. The Govt shut the metro, sealed our roads and locked down our capital. With a stolen vote nothing is safe – your shop, your savings, your children’s future. Tell Modi to sack accused no. 4, Gyanesh Kumar and the protests will stop in 30 seconds. दिल्ली के हर व्यापारी से: हम आपसे प्यार करते हैं, आपकी बात सुन रहे हैं। मेट्रो सरकार ने बंद की, सड़कें सरकार ने सील की, राजधानी पर ताला सरकार ने लगाया। जब वोट ही चोरी हो जाए, तो कुछ भी सुरक्षित नहीं – न आपकी दुकान, न आपकी बचत, न आपके बच्चों का भविष्य। मोदी जी से कहिए – आरोपी नंबर 4, ज्ञानेश कुमार को हटाएं, 30 सेकंड में आंदोलन रुक जाएगा। — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 26, 2026
हेही वाचा – ‘अनेकांनी देशाला धोका दिला अन् संविधानाशी…’; सौरभ दास यांचा थेट न्यायाधीशांवर निशाणा
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या खरेदीवर परिणाम होण्याची भीती
CTI ने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, यंदा धनत्रयोदशी 6 नोव्हेंबर रोजी असून, 8 नोव्हेंबरला दिवाळी आणि त्यानंतर भाऊबीजेपर्यंतचा काळ हा व्यापाऱ्यांसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा काळ मानला जातो. या सणासुदीच्या काळात केवळ दिल्लीमध्ये सुमारे 25,000 कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज आहे. मात्र, अशा महत्त्वाच्या व्यावसायिक मोसमात होणाऱ्या राजकीय निदर्शनांमुळे ग्राहकांना बाजारपेठांपर्यंत पोहोचणे कठीण होईल आणि त्याचा थेट परिणाम लाखो दुकानदारांच्या व्यवसायावर होईल, असा दावा संघटनेने केला आहे. प्रशासनाने मेट्रो आणि रस्ते बंद केल्यामुळे राजधानीत लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे.