निवडणूक, बंडखोरी अन् मोठी फूट; अजित पवार गटाने उमेदवारी नाकारली, चेअरमन थेट भाजपच्या वाटेवर

पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपसोबत जात लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलची घोषणा केली.
someshwar sugar factory
someshwar sugar factory

नवनाथ बोरकर, प्रतिनिधी 

बारामती : ​श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने उमेदवारी नाकारल्याने, सलग 12 वर्षे अध्यक्ष राहिलेल्या पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. काकडे-जगताप संघर्षातून पेटलेल्या या ठिणगीमुळे आणि काकडेंच्या पवार कुटुंबाशी वाढलेल्या सलोख्यामुळे बारामतीच्या राजकारणात अजित पवारां नंतरची मोठी फूट पडल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा : राजकीय वर्तुळात खळबळ! माजी मुख्यमंत्री करणार काँग्रेसमध्ये प्रवेश; हालचालींना वेग, भाजपची चिंता वाढली

​भाजप नेते आमदार संजय जगताप हेही या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने निवडणुकीला वेगळे राजकीय वळण मिळाले आहे. पुरुषोत्तम जगताप यांच्या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेमुळे सोमेश्वर कारखान्यातील सत्तासंघर्ष आता अत्यंत चुरशीचा ठरण्याची शक्यता आहे. एकंदरीत पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

NCP letter

तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी दिवंगत नेते अजित पवार यांचा फोटो आणि नाव सोमेश्वरच्या निवडणुकीत पवार कुटुंबाच्या संमतीशिवाय वापरू नये असे जाहीर पत्रकच काढले. यामुळे या निवडणुकीत अधिकच रंगत वाढली असून ही लढत आता पवार विरुद्ध पवार होण्याऐवजी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version