लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या आणि कथित ‘मत चोरी’च्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात आपला लढा अधिक तीव्र केला आहे. राहुल गांधी यांनी उद्या, सोमवार, 12 ऑक्टोबर रोजी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयापर्यंत भव्य देशव्यापी मोर्चा काढण्याची अधिकृत घोषणा केली आहे. शनिवारी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या तरुणांवर पोलीस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी बळाचा वापर करत मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. देश वाचवण्यासाठी पक्ष, जात, धर्म आणि राज्यांच्या सीमांपलीकडे जाऊन सर्व भारतीयांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘चलो दिल्ली’ची हाक आणि सरन्यायाधीशांना निवेदन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर एका विशेष पोस्टद्वारे राहुल गांधी यांनी देशवासियांना ‘चलो दिल्ली’ची हाक दिली. ते म्हणाले, “काल देशातील तरुण शांततापूर्ण आंदोलनासाठी दिल्लीच्या रस्त्यांवर उतरले होते. त्यांच्या मनात कोणता द्वेष वा राग नव्हता, तर देशाबद्दल प्रेम होते. तरीही, त्यांना पोलीस आणि भाजपच्या गुंडांनी निर्दयीपणे मारहाण केली; आपल्याला असा भारत अजिबात नको आहे.”
उद्या 12 ऑक्टोबर रोजी विरोधी पक्ष, नागरी समाज, तरुण आणि संविधानावर विश्वास ठेवणारे सर्व नागरिक एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयावर धडक देतील. या मोर्च्यादरम्यान भारताच्या सरन्यायाधीशांना एक संयुक्त निवेदन सादर केले जाईल. यामध्ये ‘मतांची चोरी तात्काळ थांबवणे’, निवडणूक आयोगाची ‘विशेष सखोल पुनरावलोकन’ (SIR) प्रक्रिया रद्द करणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घेणे या तीन प्रमुख मागण्या मांडल्या जाणार आहेत.
Yesterday, the nation’s young came out in Delhi to peacefully protest. They came with love in their hearts, not hatred or anger. They were beaten, both by cops and BJP goons. This is not the India we want. Tomorrow, we will march to the Supreme Court as Indians, united beyond party, gender, caste, community and state. Youth, all opposition parties, civil society groups, all those who believe in democracy and stand by the Constitution of India, will walk with us. We will submit a memorandum to the Chief Justice on behalf of the nation, demanding an end to vote chori, halting of SIR and the resignation of Gyanesh Kumar. Narendra Modi, Amit Shah, Ajit Doval and Mohan Bhagwat cannot silence India’s voice. These cowards cannot intimidate us. They will have to step aside. We will march together, with love, brotherhood and patriotism. Daro mat. Tomorrow, all of India will march to the Supreme Court. कल दिल्ली में देश का युवा शांतिपूर्ण विरोध के लिए सड़कों पर उतरा। उनके दिलों में नफ़रत या गुस्सा नहीं, मोहब्बत थी। लेकिन उन्हें पुलिस और BJP के गुंडों, दोनों ने पीटा। ऐसा भारत हम नहीं चाहते। कल, सोमवार 12 अक्टूबर को, हम भारतीय होने के नाते सुप्रीम कोर्ट तक मार्च करेंगे। पार्टी, महिला-पुरुष, जाति, समुदाय और राज्य की हर दीवार से ऊपर उठकर, हम सब एक साथ चलेंगे। देश का युवा, तमाम विपक्षी दल, सिविल सोसाइटी और लोकतंत्र में विश्वास रखने वाले, भारत के संविधान के साथ खड़े सभी लोग हमारे साथ चलेंगे। हम देश की ओर से मुख्य न्यायाधीश को एक ज्ञापन सौंपेंगे। हमारी माँग है – वोट चोरी बंद हो, SIR पर रोक लगे और ज्ञानेश कुमार इस्तीफ़ा दें। नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोभाल और मोहन भागवत भारत की आवाज़ को दबा नहीं सकते। ये कायर हमें डरा नहीं सकते। इन्हें पीछे हटना ही होगा।
हम सब साथ चलेंगे – मोहब्बत, भाईचारे और देशभक्ति के साथ। डरो मत। कल पूरा भारत सुप्रीम कोर्ट तक मार्च करेगा। #ChaloDilli — Rahul Gandhi (@RahulGandhi) October 11, 2026
‘पंतप्रधान मोदी आणि अमित शाह भारताचा आवाज दाबू शकत नाहीत’
केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, “नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोवाल आणि मोहन भागवत यांसारखे लोक भारताचा खरा आवाज दाबू शकत नाहीत. हे भित्रे लोक आम्हाला कोणत्याही परिस्थितीत घाबरवू शकत नाहीत आणि त्यांना शेवटी माघार घ्यावीच लागेल. आपण सर्वांनी प्रेम, बंधुभाव आणि देशभक्तीच्या भावनेने एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. त्यामुळे कोणीही घाबरण्याचे कारण नाही; उद्या संपूर्ण देश सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने कूच करेल.”
हेही वाचा – ‘आंदोलन न करण्याविषयी कोणाला काहीही लिहून दिलेले नाही’; सुटकेनंतर अभिजित दिपकेंची सूचक पोस्ट, CJP पुन्हा…
विरोधी पक्षांचा सलग तीन दिवसांपासून दिल्लीत राजकीय दबाव
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेससह संपूर्ण ‘इंडिया’ (INDIA) आघाडी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत आक्रमक झाली आहे. सुरुवातीला आकाशवाणी भवनाजवळील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला वेढा घालण्याचा प्रयत्न करताना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर जंतर-मंतरकडे कूच करतानाही विरोधकांना रोखण्यात आले. सलग तीन दिवस राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यापासून ते संसद संकुलातून विजय चौकापर्यंत पायी मार्च काढत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यापर्यंत विरोधकांनी केंद्र सरकारवर मोठा राजकीय दबाव निर्माण केला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.