नेस्को येथे आज शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसंदर्भात मोठी घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी व्यासपीठावर बसलेले भावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे बोलत रामदास कदम यांनी भाषणाना सुरुवात केली. रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यांवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पद्धतीवर, त्यांच्या वाहनांवर आणि 500 कोटी रुपयांच्या कथित मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच एकनाथ शिंदे यांच्याबाबत वक्तव्य केल्यास मराठा समाज ते सहन करणार नाही असा थेट इशारा रामदास कदम यांनी दिला.
हेही वाचा- ‘यंदाचा दसरा दुष्काळाच्या सावटाखाली’ शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुषमा अंधारे कडाडल्या
“आज त्या मैदाची अवस्था बघा… दोन्ही मैदानात जमीन आसमानाचा फरक आहे. संजय राऊत सकाळी बोलले की शिवसेना आमचे मात्र संजय दत्त आधी शिवसेनेचा आहेस का? बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर काँग्रेस सोबत जाऊन उत्सव जिल्हा मुख्यमंत्री होऊ दिल असत का? उद्धव ठाकरे यांच्या अवस्था पालीसारखी झालेली आहे ते फक्त वळवळत्यात राजकारणामध्ये जिवंत आहे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्या नेतृत्वात झाल्या. उभ्या महाराष्ट्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे म्हणून युतीचे 232 आमदार निवडून दिले. खरंतर मुख्यमंत्री पदाच्या दावेदार एकनाथ शिंदेच होते पण पुढे काय झालं मला माहित नाही.”
“जरांगे पाटील यांना आम्ही कधी काय बोलत नाही मात्र काल ते जे बोलले ते योग्य नाही जरांगे पाटील एकनाथ शिंदेंना उध्वस्त करायला निघाले तर मराठा समाज जरांगे पाटील यांना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. जारंगे पाटील तू आहेस कोण उपोषणाला बसतोस आणि बाथरूम मध्ये जाऊन गपचूप खातोस. जरंगे पाटील कोणत्या गाडीतून फिरतोय ह्या गाड्या आल्या कुठून? 10 टक्के आरक्षण, जरांगे पाटील बेईमान माणूस हरामखोर आहे. बाप दाखव नाहीतर… श्राद्ध घाल पाचशे कोटी कोणी दिले कादीर? एकनाथ शिंदे हे मराठा समाजाचे दैवत आहेत त्यांच्याबाबत जर बोलशील तर मराठा समाज खपवून घेणार नाही. जारंगे पाटील तू आहेस कोण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधानांना एकेरी भाषेमध्ये बोलतो… तुझी औकात काय? दिल्लीचा पप्पू काय बोकतो, आज शिवसेनाप्रमुख जीवन असेल तर मोदींचा सत्कार झाला असता.”
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.