NCP : विक्रम काकडेंच्या उमेदवारी मिळताच पक्षातील पहिला राजीनामा; NCP च्या नेत्यानं अजितदादांची आठवण करून देत केली बोचरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

NCP : विक्रम काकडेंच्या उमेदवारी मिळताच पक्षातील पहिला राजीनामा; NCP च्या नेत्यानं अजितदादांची आठवण करून देत केली बोचरी टीका

पुणे : पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांची उमेदवारी मिळताच पक्षात मोठी बंडखोरी सुरू झाली असून, पुण्यातून पक्षाला पहिला मोठा राजीनामा सोपवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील कार्याध्यक्ष रामदास पाटील यांनी आपल्या पदाचा तिकीट वाटपाच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्याकडे पाठवला आहे. रामदास पाटील यांनी आपल्या राजीनामा पत्रात थेट संजय काकडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा : NCP Pune MLC Candidate : पुण्यातील हायव्होल्टेज ड्रामा संपला! अखेर 'या' नेत्याला मिळाला राष्ट्रवादीचा एबी फॉर्म

रामदास पाटील यांनी पत्रात नमूद केले की, "आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या चुकीच्या उमेदवाराची घोषणा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आम्ही आमचे घरदार दावणीला लावले, 30 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो, पक्षासाठी कर्जबाजारी झालो. आणि 2017 ला ज्या संजय काकडेंनी पक्ष फोडला, पक्षाचे दोन-दोन टर्मचे नगरसेवक फोडून भारतीय जनता पार्टीत नेले, त्यांना रसद पुरवली व अजितदादांच्या पाठीत खंजीर खुपसला व देवेंद्र फडणवीस यांच्या मांडीवर जाऊन बसले; अशा संजय काकडेंच्या मुलाला जर पक्ष तिकीट देत असेल, तर आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षात काय किंमत राहणार आहे? त्यामुळे मी माझ्या सर्व पदांचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे." 

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, याबाबत दिवसभर सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. पक्षाकडून विक्रम काकडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्याने वातावरण अधिकच तापले होते. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये अनेक फेऱ्यांच्या बैठका आणि चर्चाही पार पडल्या. आज सकाळी विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर लगेचच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत संजय काकडे यांनीही पक्षात प्रवेश केल्याने या राजकीय घडामोडींना अधिक महत्त्व प्राप्त झाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number