Friday, December 05, 2025 02:09:09 AM

Sanjay Raut : तोंडाला मास्क पण तोच करारी बाणा; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त संजय राऊत यांनी देखील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

sanjay raut  तोंडाला मास्क पण तोच करारी बाणा आजारपणातही संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी

आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 13 वा स्मृतिदिन आहे. निमित्त शिवसेनेचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे शिवसेनाप्रमुखांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतील शक्तीस्थळाकडे येत आहेत. त्याचसोबत राज्यातील राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे. 17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले.

आज संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यानिमित्त शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली आहे. शिवाजी पार्कच्या परिसरात गाडीतून उतरल्यानंतर संजय राऊत हे त्यांचे बंधू सुनील राऊत यांचा हात पकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत चालत गेले.

यावेळी संजय राऊत तोंडाला मास्क लावून आल्याचे पाहायला मिळाले. संजय राऊत हे आजारी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विश्रांती करत आहेत. 31 ऑक्टोबरला एक जाहीर पत्र लिहून पुढील दोन महिने मी सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याची घोषणा केली होती.

मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन कोणताही विचार न करता ते दादरच्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले. दरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वावरील डिजिटल चरित्र लवकरच वाचकांच्या भेटीस येणार असून 'इतिहास घडवणारा व्यंगचित्रकार' असे त्याचे नाव आहे.

तसेच संजय राऊत यांनी ट्वीटरवर पोस्ट करत म्हटलं की, "ज्यांच्यामुळे मी घडलो असे एकमेव शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना! असा पुरुष सिंह होणे नाही! मराठी माणसाने एकजुटीने राहावे  आणि महाराष्ट्र शत्रूंशी लढावे हीच त्यांना आदरांजली!साहेब,
जय महाराष्ट्र!"

https://www.jaimaharashtranews.com/politics/a-case-has-been-registered-against-amit-thackeray-for-unveiling-the-statue-of-chhatrapati-shivaji-maharaj-erected-in-navi-mumbai-without-permission/43957


सम्बन्धित सामग्री