महाराष्ट्र: काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी विठुरायाला साकडं घातलं होत. शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ दे.. असं साकडं अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी विठुरायाला घातलं होत. त्यामुळे आता विठुराया आशा पवारांना पावणार का? ही चर्चा सर्वत्र रंगलीय. दरम्यान अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार अशी सर्वत्र चर्चा रंगत असतांनाच यावर आता रोही पवारांनी भाष्य केलंय.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
काय म्हणाले रोहित पवार?
ज्या लोकांनी पवार कुटुंबाला एकत्र पाहिले आहे, अशा अनेक लोकांचे मत आहे की शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं. पवारसाहेब आणि दादा एकत्र आले तर याचा नक्कीच फायदा होईल. पण आम्ही आता संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकत्र येण्याबाबतचा निर्णय मोठ्या पवारसाहेबांना आणि दादांना घ्यायचा आहे, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे शरद पवार गट अजित पवार गट भविष्यात एकत्र येऊ शकतात, या चर्चेला बळ मिळत आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी पक्षांतर्गत मिळणाऱ्या जबाबदारीवर देखील भाष्य केलं आहे. पक्षात मला छोटी-मोठी जबाबदारी दिली तर मी स्वीकारेल. पण पक्षात १०-१५ वर्षे काम करणारी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असेल तर सर्व पदाधिकारी त्याचं स्वागत करतील, असंही रोहित पवार म्हणालेत.
दरम्यान आता रोहित पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत हे महत्वपूर्ण वक्तव्य केली असून नक्की राष्ट्रवादीचे काका पुतणे कधी एकत्र येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.