‘महिलांच्या सैन्य भरतीचा प्रस्ताव मी ठेवला होता’; शरद पवारांनी सांगितला संरक्षण मंत्री असतानाचा किस्सा

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' विषयी सविस्तर माहिती दिली. मात्र, काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्यातील परिस्थिती अशी अजिबात नव्हती, असं शरद पवार म्हणाले.

‘महिलांच्या सैन्य भरतीचा प्रस्ताव मी ठेवला होता’; शरद पवारांनी सांगितला संरक्षण मंत्री असतानाचा किस्सा

मुंबई: बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दोन महिला अधिकाऱ्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' विषयी सविस्तर माहिती दिली. त्यापैकी एक म्हणजे सोफिया कुरेशी तर दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग होत्या. आज अवघा देश त्यांना ओळखत आहे. मात्र, काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्यातील परिस्थिती अशी अजिबात नव्हती, असं भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार शरद पवार यांनी केले.

हेही वाचा: 'आमचा पंतप्रधान डरपोक आहे' पाकिस्तानचे खासदार शाहिद अहमद खटक यांची शरीफ यांना चपराक

महिलांच्या सैन्य भरतीवर शरद पवारांची प्रतिक्रिया:

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार शरद पवार म्हणाले की, 'जेव्हा मी संरक्षण मंत्री होतो तेव्हा मी महिलांना सैन्यात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तेव्हा तिन्ही दलांच्या प्रमुखांनी तो प्रस्ताव फेटाळून लावला होता. पण, विरोध असूनही मी महिलांना सैन्यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.' साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात खासदार शरद पवार बोलत होते.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

'महिलांना हे झेपवणार नाही' सैन्य दलाच्या प्रमुखांचे पवारांना प्रत्युत्तर:

पुढे शरद पवार म्हणाले की, 'संरक्षणमंत्री असताना सैन्य दलाच्या बैठकीत मी सुचवलं की, जगातील अनेक देशांमध्ये सैन्यामध्ये मुली महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मग आपण हा निर्णय का घ्यायचा नाही? मात्र तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी मला सांगितलं की हे शक्य नाही. महिलांना हे झेपवणार नाही, कठीण काम आहे. मग मी त्यांना विचार करून पुढच्या मिटिंगमध्ये सांगा असं सांगितलं.'

'पुढच्या बैठकीत तिघांनीही स्पष्ट शब्दांत नाही म्हटले. त्यानंतरच्या बैठकांमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी देखील नाही म्हटले. शेवटी, मला हे सांगावे लागले की देशातील जनतेने मला संरक्षणविषयक निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. म्हणूनच, मी म्हणालो की आतापासून भारतीय सैन्यात मुली असतील आणि त्यांना संधी दिली पाहिजे. म्हणूनच, आज आपण आपल्या दोन्ही बहिणी संपूर्ण देशवासीयांना भारत-पाकिस्तान सीमेवर काय घडत आहे याची सविस्तर माहिती देताना पाहत आहोत,' अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवारांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number