BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत शिंदेंची मोठी फिल्डिंग! 60 माजी नगरसेवकांचे तिकीट फायनल

एकनाथ शिंदे यांनी आपले राजकीय डावपेच आक्रमक केले असून, आज त्यांच्या 'नंदनवन' निवासस्थानी मुंबईतील 60 माजी नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेत शिंदेंची मोठी फिल्डिंग! 60 माजी नगरसेवकांचे तिकीट फायनल

BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election) उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे 2 दिवस शिल्लक असताना, राजकीय हालचालींनी कमालीचा वेग घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले राजकीय डावपेच आक्रमक केले असून, आज त्यांच्या 'नंदनवन' निवासस्थानी मुंबईतील 60 माजी नगरसेवकांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उमेदवारांना AB फॉर्म आणि निवडणुकीचा 'विजयी मंत्र' दिला जाण्याची शक्यता आहे.

60 शिलेदारांवर विश्वास; नंदनवनवर खलबतं 

शिवसेना (UBT) आणि इतर पक्षांतून बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या 60 माजी नगरसेवकांचे तिकीट मुख्यमंत्र्यांनी जवळपास निश्चित केले आहे. यामध्ये 2017 च्या निवडणुकीतील 39 आणि इतर पक्षांतील 21 नगरसेवकांचा समावेश आहे. आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या या बैठकीत सर्व नगरसेवकांना आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या या नगरसेवकांना उमेदवारी देऊन एकनाथ शिंदेंनी त्यांना मोठा दिलासा दिला आहे.

हेही वाचा – BMC Election: BMC Election: कॉंग्रेसचंही ठरलं! वंचितसोबत युतीची अधिकृत घोषणा; जागावाटपाबाबत महत्त्वाची अपडेट

प्रकाश महाजन आता शिवसेनेचे 'आवाज' 

दरम्यान 2 दिवसांपूर्वीच मनसेला 'जय महाराष्ट्र' करून शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजन यांना एकनाथ शिंदेंनी तातडीने मोठी जबाबदारी दिली आहे. महाजन यांची शिवसेनेच्या राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील अनुभवी नेते असलेले महाजन मनसेतही प्रवक्ते म्हणून आक्रमक भूमिका मांडायचे, आता तेच कौशल्य ते शिंदेंच्या शिवसेनेसाठी वापरतील.

जागावाटपाचा 227 जागांचा फॉर्म्युला? 

महायुतीमध्ये मुंबईतील 227 पैकी 207 जागांचा तिढा सुटल्याचे समजते. यामध्ये:
भाजप: 128 जागांवर लढणार.
शिवसेना (शिंदे गट): 79 जागांवर निवडणूक लढवणार.
उर्वरित 20 जागा: या जागांवर चर्चा अंतिम टप्प्यात असून आज रात्री किंवा उद्यापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

आघाडी आणि युतीचे चित्र स्पष्ट मुंबईत आता लढाई स्पष्ट झाली आहे. एका बाजूला भाजप-शिवसेना (शिंदे गट) यांची महायुती आहे, तर दुसरीकडे काँग्रेस-वंचित यांची आघाडी निश्चित झाली आहे. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिवसेना (UBT) यांचीही युती अंतिम टप्प्यात असून आज रात्रीपर्यंत महाविकास आघाडीच्या जागावाटपावरही शिक्कामोर्तब होईल.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number