Sunday, November 16, 2025 09:09:35 AM

गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शाहांचे चरण धुवून एकनाथ शिंदेंनी आशिर्वाद घेतले; राऊतांनी साधला निशाणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आहे.

गुरुपौर्णिमेनिमित्त अमित शाहांचे चरण धुवून एकनाथ शिंदेंनी आशिर्वाद घेतले राऊतांनी साधला निशाणा

मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दौऱ्यावर गेल्याची बातमी समोर आली. एकनाथ शिंदे अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर का गेले? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. सूत्रांनुसार, दिल्ली दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आहे. 

हेही वाचा: रोहिणी खडसेंच्या 'एक्स पोस्ट'नंतर शिंदेंच्या कार्यालयाबाहेरील कचरा पांढऱ्या कपड्याने झाकला

काय म्हणाले संजय राऊत?

'गुरूपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले! धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरुपौर्णिमेनिमित्त शिंदे धुत आहेत असे दाखवले. दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले! त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांत चर्चा झाली! तूर्त इतकेच! बाकीचा तपशील लवकरच!', अशी टीका खासदार संजय राऊतांनी एक्सच्या माध्यमातून केली. 

 

 

हेही वाचा: शिंदेंच्या ऑफिसबाहेर कचऱ्याचा ढीग; 'जय महाराष्ट्र'च्या प्रतिनिधीवर अधिकाऱ्याची अरेरावी

मंत्री उदय सामंतांचा राऊतांना प्रत्युत्तर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर मंत्री उदय सामंत म्हणाले की, 'एकनाथ शिंदे हे दिल्लीत अमित शहा यांना भेटले यात चुकीचं काय आहे. एनडीए सरकारमध्ये आहोत, आमचे नेते त्यांना भेटतात.  आयकर नोटीस संदर्भात किंवा राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांची भेट घेतलेली नाही. शिंदे आणि आमच्या पक्षाला ट्रोल करणारे उबाठा यांना जनतेन निवडणुकीत ट्रोल केले विसरू नका'. 

 


सम्बन्धित सामग्री