मुंबई : मुंबईमध्ये परप्रांतियांची अरेरावी, मराठी-हिंदी वाद हे विषय ताजे असतानाच एका आमदारानं उत्तर भारतीयांच्या बाजूने वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मराठी आणि उत्तर भारतीयांबाबत तुलना करत उत्तर भारतीयांना झुकते माप दिले आहे. मराठी ही आई असून उत्तर भारतीय ही मावशी आहे, असे सुर्वे यांनी म्हटले आहे. इतकेच, नव्हेतर मावशी जगली पाहिजे, आई मेली तरी चालेल, असेही सुर्वे यांनी नमूद केले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीयांची कड घेण्याच्या नादात थेट मायमराठीच्या मरणाची इच्छा व्यक्त केली आहे. सुर्वेंच्या या वादग्रस्त वक्तव्यांचा समाचार घेत विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. प्रकाश सुर्वे यांचे वक्तव्य हा प्रत्येक मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान असल्याचे विरोधक म्हणाले आहे.
हेही वाचा : Pune: बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांनी पुणे-नाशिक महामार्ग रोखून धरला, प्रशासनाला आव्हान देत केली ही मागणी