Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : "प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार" बापट यांना मारहाण; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

पुण्यात डीजेच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या विद्यानंद बापट यांना एका व्यकीतने मारहाण केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

Devendra Fadnavis on Vidyanand Bapat : &quotप्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार&quot बापट यांना मारहाण; देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

पुण्यात सध्या डीजे वरून वाद पेटलेला पाहायला मिळतो आहे. याच डीजेच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या विद्यानंद बापट यांना एका व्यकीतने मारहाण केली. पुण्यात एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना काही तरुणांनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केल्याचे पाहायला मिळाले. या घटनेमुळे पुण्यात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बापट हे सार्वजनिक उत्सवांमध्ये DJ आणि मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकरच्या वापरावर निर्बंध आणण्याची मागणी करत आहेत.

याच मुद्द्यावर ते माध्यमांशी संवाद साधत असताना काही तरुण तेथे आले. त्यांनी बापट यांना बोलण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्यावर हात उचलण्यात आल्याचा आरोप आहे. मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीबाबत मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.  

हेही वाचा- पुण्यात DJला विरोध करणं पडलं महागात? विद्यानंद बापटांना टिळक रोडवर मारहाण; व्हिडिओ व्हायरल

फडणवीसांनी म्हटलं की, “कोणावरही अशा पद्धतीने मारहाण करणे योग्य नाही. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मतभेद असले तरी हल्ला करणे चुकीचे आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुण्यासारख्या शहरात अशा घटना घडणे योग्य नाही. मला असं वाटतं की, एकमेकांना समजून, एकमेकांच्या भावना समजून या पुण्यासारख्या ठिकाणी मला असे वाद योग्य वाटतं नाहीत.”

“मी पहिले देखील सांगितलं की गणेश उत्सव पारंपारिक पध्दतीकडे नेला पाहिजे, आपल्या गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीकडे नेला पाहिजे त्या दृष्टीने काय करता येईल त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत कदाचित पहिल्या वर्षी शंभर टक्के होणार नाही पण शंभर टक्के जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असंही पुढे फडणवीसांनी म्हटलं आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number