‘मी दादांसारखी मोठ्या मनाची नाही, एकदा पक्षातून बाहेर पडलेल्याला पुन्हा…’; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना थेट इशारा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचारादरम्यान विरोधकांना आणि बंडखोरांना ठणकावून सांगताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
‘मी दादांसारखी मोठ्या मनाची नाही, एकदा पक्षातून बाहेर पडलेल्याला पुन्हा…’; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना थेट इशारा
Sunetra Pawar warning Purushottam Jagtap

Someshwar Sugar Factory: बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचारादरम्यान विरोधकांना आणि बंडखोरांना ठणकावून सांगताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करून विरोधी पॅनल उभारणारे पुरुषोत्तम जगताप यांच्यावर नाव न घेता थेट टीका करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “अजितदादा अत्यंत मोठ्या मनाचे होते, मात्र मी दादांसारखी मुळीच नाही. त्यामुळे एकदा पक्षातून किंवा गटातून बाहेर पडलेला नेता कायमचा बाहेरच राहील, त्याला पुन्हा जवळ घेतले जाणार नाही.” निवडणुकांच्या काळात अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जात असून, सभासदांनी अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.

निकाला नंतरच ठरणार कारखान्याचा नवा अध्यक्ष; सुनेत्रा पवारांचे स्पष्टीकरण

सोमेश्वर कारखान्याचा भावी अध्यक्ष आधीच निश्चित झाल्याच्या चर्चांचा फोलपणा स्पष्ट करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अध्यक्षांची निवड ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सर्व सभासद आणि संचालकांच्या मर्जीने सर्वसमावेशक पद्धतीने केली जाईल. अध्यक्षपदाबाबत पूर्वीच कोणताही निर्णय झालेला नसून पसरवले जाणारे दावे पूर्णपणे असत्य आहेत. सर्वांनी प्रचारावर आणि सहकाराच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी ग्वाही त्यांनी दिली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार आणि जय पवार गावोगावी बैठका घेऊन प्रचार यंत्रणा राबवत आहेत.

प्रचाराचे शेवटचे 3 दिवस शिल्लक; 11 तारखेला 21 जागांसाठी पार पडणार मतदान

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांसाठी येत्या 11 तारखेला मतदान पार पडणार असून, प्रचाराचे आता केवळ 3 दिवस हातात उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय गटांनी प्रचाराची राळ उडवून दिली आहे. 9 तारखेला प्रचाराची सांगता होणार असल्याने जाहीर सभांपेक्षा घरोघरी जाऊन थेट गाठीभेटी घेण्यावर भर दिला जात आहे.

हेही वाचा – MPSC आंदोलनाच्या नावाखाली मद्यपान, छेडछाड आणि धांगडधिंगा; नवनाथ बन यांच्याकडून व्हिडीओ दाखवत पर्दाफाश

या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे राष्ट्रवादी पॅनल, शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनी चालवलेला झंझावाती प्रचार, आणि भाजपच्या पाठिंब्याने बंडखोर पुरुषोत्तम जगताप तसेच माजी आमदार संजय जगताप यांचे विरोधी पॅनल यांच्यात तुफान त्रिकोणी लढत रंगली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version