बारामतीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलने उघडलं विजयी खातं

राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पहिल्याच निकालात आपले विजयी खाते उघडले आहे.
बारामतीत राष्ट्रवादीचा दणदणीत विजय! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलने उघडलं विजयी खातं
Someshwar Karkhana election

बारामती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, सुरुवातीच्या निकालांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) जोरदार मुसंडी मारली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने पहिल्याच निकालात आपले विजयी खाते उघडले आहे. या निवडणुकीतील ‘बी’ वर्ग गटातून सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलचे उमेदवार संग्राम सोरटे यांनी 131 एकूण मतांपैकी तब्बल 92 मते मिळवून शानदार विजय संपादन केला.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील स्थानिक आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची ही पहिलीच मोठी परीक्षा मानली जात होती. त्यामुळे या सुरुवातीच्या विजयाने बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र गुलाल उधळत जल्लोष साजरा केला जात आहे.

पार्थ पवारांचे नियोजन अन् 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा निर्धार

सोमेश्वर कारखान्याच्या एकूण 21 संचालक पदांच्या जागांसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडले होते. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांनी स्वतः मैदानात उतरून धुरा सांभाळली होती. मतदानाच्या दिवशी विविध केंद्र आणि गावांना भेटी देत त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले होते. “या निवडणुकीत आमचे पॅनेल 21 पैकी 21 जागांवर दणदणीत विजय मिळवेल,” असा ठाम विश्वास पार्थ पवार यांनी व्यक्त केला होता. तर दुसरीकडे, निकालाच्या सुरुवातीच्या कलांवर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार यांनीही मतदारांचे आभार मानत, “आम्ही विजयाची योग्य दिशा धरली असून संपूर्ण 21-0 असा स्पष्ट कौल जनता आम्हालाच देईल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा – ठाकरे कुटुंबाच्या अडचणीत वाढ; आदित्य ठाकरे, अमित ठाकरे अन् अंजली दमानिया यांच्यावर मुंबई पोलिसांकडून गुन्हे दाखल

जगताप यांच्या बंडखोरीला मतदारांची चपराक

या निवडणुकीची पार्श्वभूमी अत्यंत राजकीय घडामोडींची ठरली होती. सोमेश्वर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत आमदार संजय जगताप यांच्या सहकार्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी व अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र, पहिल्याच फेरीच्या निकालाने बंडखोर जगताप गटाला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. दुपारपर्यंत या निवडणुकीचे उर्वरित सर्व निकाल हाती येतील. सुरुवातीच्या कलांवरून कारखान्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अबाधित राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version