Omraje Nimbalkar : निकाल फिरला, गेम फसला ? ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया समोर,"आम्हाला दरवाजे उघडे आहेत त्या प्रत्येक… "

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निर्दोष मुक्ततेनंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा रंगली आहे. याचपार्श्वभूमिवर प्रतिक्रिया देत निंबाळकरांनी मोठं विधान केलं आहे.

Omraje Nimbalkar : निकाल फिरला, गेम फसला ? ओमराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया समोर,&quotआम्हाला दरवाजे उघडे आहेत त्या प्रत्येक… &quot

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निर्दोष मुक्ततेनंतर धाराशिवचे ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा रंगली आहे. शिंदे गटात प्रवेशाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ओमराजे आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत. मात्र कोणताही घाईचा निर्णय न घेता मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

याचपार्श्वभूमिवर जय महाराष्ट्र वाहिनीला प्रतिक्रिया देत असताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “कोर्टाच्या निकालाचा आणि माझ्या पक्षांतराचा काहीच मला वाटते कुठे संबंध येत नाहीये. मी माझ्या आयुष्यातली 20 वर्ष आमच्या सगळ्या कुटुंबांनी या निकालासाठी वाट पाहिलेली आहे. त्याच्यामुळे राजकीय निर्णयापेक्षा हा निर्णय माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी महत्त्वाचा होता. त्याच अनुषंगाने आम्ही या निर्णयाची वाट बघत होतो. दुर्दैवान अपेक्षित निर्णय आला नाही पण या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी आम्ही दाद मागू, आणि आपल्या न्यायिक प्रक्रियेप्रमाणे, संविधानाप्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे जे जे न्यायालयाचे दरवाजे आम्हाला उघडे आहेत त्या प्रत्येक न्यायालयाकडे आम्ही दात मागून आम्हाला न्याय घेण्याचा प्रयत्न करू..”

हेही वाचा- Omraje Nimbalkar: ठाकरेंचे नेते भल्या पहाटे ओमराजेंच्या भेटीला! ठाकरेंकडून मनधरणीच्या प्रयत्नांना जोर; ‘ऑपरेशन टायगर’वर काय भूमिका घेणार?

तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनी आज खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. यावेळी तिघांमध्येही मध्यरात्री तब्बल एक तास चर्चा झाल्याचे समोर आले आहे. तसेच ओमराजे निंबाळकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत दुपारी चार वाजता महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

गोवर्धनवाडीमध्ये होणाऱ्या बैठकीत प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मतांचा आढावा घेतल्यानंतर ओमराजे आजच आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, त्यांच्या निर्णयाकडे ठाकरे आणि शिंदे गटासह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, त्यांच्या संभाव्य भूमिकेमुळे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असलेल्या काही खासदारांच्या राजकीय गणितावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number