Tamil Nadu Politics : तामिळनाडूत विजय यांचा टीव्हीके आणि काँग्रेसचे नवे समीकरण? भडकलेल्या डीएमकेचा काँग्रेसवर विश्वासघाताचा आरोप

काँग्रेसने एक व्हर्च्युअल बैठक घेऊन विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला आहे. यानंतर डीएमकेने काँग्रेसवर संताप व्यक्त केला आहे.

Tamil Nadu Politics : तामिळनाडूत विजय यांचा टीव्हीके आणि काँग्रेसचे नवे समीकरण? भडकलेल्या डीएमकेचा काँग्रेसवर विश्वासघाताचा आरोप

Congress TVK Alliance News : तामिळनाडू विधानसभेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व पेच निर्माण झाला असून, ‘थलपती’ विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक 108 जागा जिंकल्यानंतरही त्यांना बहुमतासाठी 10 आमदारांची आवश्यकता आहे. ही कसर भरून काढण्यासाठी विजय यांनी आता काँग्रेसला साद घातली असून, दोन्ही पक्षांमधील चर्चा सकारात्मक वळणावर आहे. काँग्रेसने या युतीसाठी हिरवा कंदील दाखवल्याने राज्यातील जुनी डीएमके-काँग्रेस मैत्री संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या नव्या समीकरणामुळे तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात होताना दिसत आहे.

काँग्रेसची ‘कॅबिनेट’ अट आणि विजय यांची तयारी
एका वृत्तानुसार, काँग्रेसने एक व्हर्च्युअल बैठक घेऊन विजय यांच्या टीव्हीके पक्षाला पाठिंबा देण्याचा ठराव मंजूर केला आहे. या निवडणुकीत 5 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने पाठिंब्याच्या बदल्यात 2 कॅबिनेट पदे आणि सरकारी मंडळांच्या अध्यक्षपदांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, 7 मे रोजी थलपती विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता असून, त्यांच्यासोबत 7 कॅबिनेट मंत्री देखील पदभार स्वीकारू शकतात. 234 सदस्य असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी 118 हा आकडा गाठणे आता विजय यांच्यासाठी सोपे झाले आहे.

डीएमकेचा काँग्रेसवर विश्वासघाताचा आरोप, स्टॅलिन यांचा संताप
काँग्रेस आणि टीव्हीकेच्या संभाव्य युतीमुळे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या डीएमके पक्षात मोठी अस्वस्थता पसरली आहे. “काँग्रेसने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” अशा जळजळीत शब्दात डीएमके प्रवक्ते सरवणन अण्णादुराई यांनी टीका केली. डीएमकेच्या मदतीमुळेच काँग्रेसला 5 जागा जिंकता आल्या; अन्यथा, त्यांना खातेही उघडता आले नसते, असा टोलाही त्यांनी लगावला. यासोबतच, विजय यांचा टीव्हीके पक्ष भाजपच्या जवळचा असल्याचा खळबळजनक आरोपही डीएमकेने केला आहे.

हेही वाचा – Mamata Banerjee: ममतादीदी इरेला पेटल्या, मुख्यमंत्रिपद, सोडण्यास नकार; राज्यपाल अधिकार वापरणार? संविधानातील तरतूद काय?

डावे पक्ष आणि छोट्या मित्रपक्षांवर विजय यांची नजर
बहुमताचा आकडा अधिक मजबूत करण्यासाठी विजय केवळ काँग्रेसवर अवलंबून न राहता इतर पर्यायांचीही चाचपणी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, टीव्हीके आता व्हीसीके, सीपीआय(एम), सीपीआय आणि आययूएमएल यांसारख्या डाव्या व प्रादेशिक पक्षांशी संपर्क साधत आहे. या पक्षांना लवकरच सत्तास्थापनेच्या चर्चेसाठी निमंत्रण पाठवले जाण्याची शक्यता आहे. जरी डीएमकेने हे पक्ष फुटणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला असला, तरी राजकारणातील बदलती समीकरणे पाहता काहीही घडू शकते.

सत्तास्थापनेचे नवीन गणित
तामिळनाडूच्या राजकारणात सत्ता स्थापनेसाठी लागणारी 10 जागांची जुळवाजुळव करण्यासाठी विजय यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. जर काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे समर्थन मिळाले, तर विजय यांचा पक्ष सहजपणे सत्ता स्थापन करेल. बुधवारी काँग्रेसकडून समर्थनाचे अधिकृत पत्र टीव्हीकेला दिले जाण्याची शक्यता असून, त्यानंतर सर्व काँग्रेस आमदार विजय यांची भेट घेतील. ही भेट राज्याच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरेल.

हेही वाचा – West Bengal Election: पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेची सगळी सूत्र गृहमंत्री अमित शाहांकडे; भाजपची महा-रणनीती, मुख्यमंत्रीपदाचा ‘सस्पेन्स’ वाढला

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number