मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा 9 जूनला होणार आहे. मुलुंडच्या कालिदास सभागृहात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. या मेळाव्यासाठी लढा आपल्या मुंबईचा अशी टॅगलाईन ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.
9 जूननंतर मुंबईत ठिकठिकाणी विविध प्रश्नांवर ठाकरे गट आंदोलन करणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हा प्रमुख मुद्दा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धारावी पुनर्विकास करताना मुंबईतील अनेक ठिकाणच्या जागा अदानी समूहाला राज्य सरकारच्या वतीने दिली असल्याने ठाकरे गट अधिक आक्रमक भूमिका घेणार आहे. यामध्ये मुलुंड, कुर्ला, मालाड इतर ठिकाणांचा समावेश आहे.
हेही वाचा : अमेरिकेत 12 देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9 जून रोजी मुलुंड येथून ठाकरे गटाकडून सुरुवात केल्यानंतर मुंबईतील इतर प्रश्नावर देखील आंदोलन आणि मेळावे काढण्यात येणार आहेत. लढा आपल्या मुंबईचा अंतर्गत विविध ठिकाणी मेळावे घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये रस्ते घोटाळा, पाणी प्रश्न, राज्य सरकारच्या योजना याचा देखील समावेश असणार आहे.
ठाकरे गटाचं मिशन मुंबई
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई पालिकेची निवडणूक लढण्यात येणार आहे. 9 जूनपासून ठाकरे गटाकडून पालिकेच्या तयारीला सुरुवात करण्यात येणार आहे. मुलुंडच्या कालिदास सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार आहे. आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. 'लढा आपल्या मुंबईचा' या टॅगलाईन अंतर्गत ठाकरे गट आंदोलन आणि मेळावे करणार आहे. 9 जूननंतर मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन पुकारण्यात येणार आहे. धारावी पुनर्विकासाचा मुद्दा निवडणुकीत तापणार असल्याचे म्हटलं जात आहे. ठाकरे गटाकडून रस्ते घोटाळा, पाणी प्रश्न, राज्य सरकारच्या योजनांनाही लक्ष्य केले जाणार आहे.