नवी दिल्ली : अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी महत्त्वाची घोषणा जाहीर केली आहे. अमेरिकेत 12 देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 देशांमधील लोकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आणि लोकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशांमध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो प्रजासत्ताक, विषुववृत्तीय गिनी, इरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांचा समावेश आहे. ही बंदी 9 जूनपासून लागू होत आहे. याशिवाय, सात देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास आंशिक बंदी घालण्यात आली आहे. हे इमिग्रेशन आणि नॉन-इमिग्रेशन व्हिसाला लागू होईल. या देशांमध्ये बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे.
हेही वाचा : संभाजीनगरमध्ये सुर्यतेज अर्बन निधी बँकेचा घोटाळा; चौघांविरूद्ध गुन्हा दाखल
अमेरिकेत कोणत्या 12 देशांना बंदी?
अफगाणिस्तान
म्यानमार
चाड
काँगो
इक्वेटोरियल गिनी
इरिट्रिया
हैती
इराण
लिबिया
सोमालिया
सूदान
येमेन
अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव 12 देशातील लोकांना अमेरिकेत जाण्यास बंदी घातली आहे. ही बंदी 9 जूनपासून लागू होणार आहे. याशिवाय 7 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत येण्यास आंशिक बंदी घालण्यात आली आहे. हे इमिग्रेशन आणि नॉन-इमिग्रेशन व्हिसाला लागू होईल. आंशिक बंदी म्हणजे कोणत्याही गोष्टीवर पूर्णपणे बंदी न लावता, विशिष्ट परिस्थितीत किंवा कालावधीत बंदी घालणे. याला अनेकदा अपूर्ण बंदी किंवा अंशत: प्रतिबंध असेही म्हणतात.
इमिग्रेशन व्हिसा आणि नॉन-इमिग्रेशन व्हिसातील फरक
एका व्यक्तीला परदेशी देशात कायमचे राहण्याची आणि काम करण्याची परवानगी देणारा व्हिसा म्हणजे इमिग्रेशन व्हिसा होय. तर एका व्यक्तीला परदेशात तात्पुरत्या कालावधीसाठी, जसे की पर्यटन, व्यवसाय किंवा शिक्षण यांसारख्या कारणांसाठी, प्रवेश करण्याची परवानगी देणारा व्हिसा म्हणजे नॉन-इमिग्रेशन व्हिसा होय.
'या' सात देशातील नागरिकांना आंशिक बंदी
बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला आदी देशातील लोकांना अमेरिकेत जाण्यास आंशिक बंदी घालण्यात आली आहे.