Saturday, June 06, 2026 10:30:58 AM

Shwetank Tambe Death : ठाकरेंच्या युवासेनेचं तडफदार नेतृत्व हरपलं! 30 व्या वाढदिवसानंतर आठवड्यातच श्वेतांक तांबेचा अपघाती अंत

वांद्रे पूर्व विभागातील शिवसैनिकांचा लाडका चेहरा आणि युवासेनेचे विधानसभा समन्वयक श्वेतांक तांबे यांचे एका भीषण अपघातात आकस्मिक निधन झाले आहे.

shwetank tambe death  ठाकरेंच्या युवासेनेचं तडफदार नेतृत्व हरपलं 30 व्या वाढदिवसानंतर आठवड्यातच श्वेतांक तांबेचा अपघाती अंत

Shwetank Tambe Death : वांद्रे पूर्व विभागातील शिवसैनिकांचा लाडका चेहरा आणि युवासेनेचे विधानसभा समन्वयक श्वेतांक तांबे यांचे एका भीषण अपघातात आकस्मिक निधन झाले आहे. अवघ्या 30 व्या वर्षी काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे.

वाढदिवसाचा आनंद ठरला अखेरचा
अवघ्या काही दिवसांपूर्वीच श्वेतांकने आपला 30 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा स्वीकार करणारा हा हसरा चेहरा इतक्या लवकर एक्झिट घेईल, अशी पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती. एका अपघाताने त्यांचे आयुष्य अकाली संपले असून तांबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

'हसमुख' व्यक्तिमत्वाला श्रद्धांजली
श्वेतांक तांबे केवळ एक राजकीय कार्यकर्ता नव्हता, तर आपल्या लाघवी स्वभावामुळे त्याने मैत्रीची मोठी साखळी जोडली होती. त्यांच्या निधनानंतर केवळ ठाकरे गटच नव्हे, तर शिंदेची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनीही भावूक श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हेही वाचा - Gokul Milk Union: गोकुळ दूध संघात मोठी उलथापालथ! प्रथमच प्रशासक मंडळाची नियुक्ती; हसन मुश्रीफ यांना धक्का

आईसोबतची ती 'मूव्ही डेट' ठरली आठवण
श्वेतांक आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम करायचा. काही काळापूर्वीच त्याने आपल्या आईसोबतच्या 'मूव्ही डेट'चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्याची चर्चा आता त्यांचे मित्र भावूक होऊन करत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.


सम्बन्धित सामग्री