देशाच्या राजकारणात मोठा भूकंप! ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांचा पक्ष थेट ‘INDIA’ आघाडीत दाखल

मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी जिल्हास्तरावर तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये 'INDIA' आघाडीतील सर्व 7 घटक पक्षांचे संयुक्त आंदोलन पार पडणार आहे.
INDIA alliance
INDIA alliance

TVK Joins INDIA Alliance: दक्षिण भारताच्या राजकारणातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. तमिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि लोकप्रिय अभिनेते थलापती विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने विरोधी पक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील ‘INDIA’ आघाडीत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. तमिळनाडू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मणिक्कम टागोर यांनी या राजकीय घडामोडीला अधिकृत दुजोरा दिला आहे. TVK च्या या समावेशामुळे राज्यातील आणि केंद्र स्तरावरील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून, तमिळनाडूत ‘INDIA’ आघाडीची ताकद कमालीची वाढल्याचे मानले जात आहे.

निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनात TVK उतरणार

‘INDIA’ आघाडीत समावेश होताच TVK पक्षाने प्रत्यक्ष राजकीय आंदोलनात उतरण्याची घोषणा केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी जिल्हास्तरावर तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ‘INDIA’ आघाडीतील सर्व 7 घटक पक्षांचे संयुक्त आंदोलन पार पडणार आहे. या सर्व निदर्शनांना विजय यांच्या पक्षाने पूर्ण पाठिंबा दर्शवला असून, पक्षाचे सर्व कार्यकर्ते यात ताकदीने सहभागी होणार आहेत. पक्षाच्या या ऐतिहासिक प्रवेशाचा ठराव सर्वपक्षीय संमतीने मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा –  “मी वर्गीकरण होऊ देणार नाही, शिंदेंसारखे पाच जण जरी आले तरी…” मातंग समाजाच्या मुद्द्यावरून सदावर्तेंचा सूर चढला

2026 च्या विधानसभा निवडणुकीत विजय यांचा ऐतिहासिक विजय

तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 मध्ये थलापती विजय यांच्या पक्षाने आपल्या पहिल्याच मैदानात अभूतपूर्व यश मिळवले होते. राज्यातील एकूण 234 विधानसभा जागांपैकी TVK ने तब्बल 108 जागा जिंकून सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र, स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 या जादुई आकड्यापासून पक्ष अवघ्या 10 जागा दूर राहिल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी विजय यांना बिनशर्त पाठिंबा दिला. या मदतीच्या जोरावर मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले आणि आता या सहकार्याचे रूपांतर ‘INDIA’ आघाडीतील अधिकृत युतीत झाले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version