विशाखा राऊत अपात्रच! कोकण भवनातील अपील फेटाळले; जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा आदेश कायम

महिनाभरापूर्वीच ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात धक्का बसला आहे.
vishakha raut
vishakha raut

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणी अपात्र ठरवण्यात आले होते. कोकण विभागाचे अपील प्राधिकारी तथा विभागीय आयुक्तांनी विशाखा राऊत यांचे अपील फेटाळत पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा 20 ऑगस्ट 2026 रोजीचा आदेश कायम ठेवला आहे. या प्रकरणाचा संबंध नगरसेवक अपात्रतेशी असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दादर शिवाजी पार्कवरील प्रभाग क्रमांक 191 मागासवर्गीय महिला प्रवर्गातून विशाखा राऊत निवडून आल्या होत्या. मात्र, शिंदे गटाच्या उमेदवार प्रिया सरवणकर यांनी राऊत यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पालघर समितीने अधिकार क्षेत्राचे कारण देत हे कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवले.

हेही वाचा : राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवाराचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांसाठी थेट…

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version