उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. महिनाभरापूर्वीच ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात धक्का बसला आहे. कोकण विभागाचे अपील प्राधिकारी तथा विभागीय आयुक्तांनी विशाखा राऊत यांचे अपील फेटाळत पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा 20 ऑगस्ट 2026 रोजीचा आदेश कायम ठेवला आहे. या प्रकरणाचा संबंध नगरसेवक अपात्रतेशी असल्याने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दादर शिवाजी पार्कवरील प्रभाग क्रमांक 191 मागासवर्गीय महिला प्रवर्गातून विशाखा राऊत निवडून आल्या होत्या. मात्र, शिंदे गटाच्या उमेदवार प्रिया सरवणकर यांनी राऊत यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर पालघर समितीने अधिकार क्षेत्राचे कारण देत हे कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवले.
हेही वाचा : राज्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शरद पवाराचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांसाठी थेट…
या निर्णयाविरोधात आणि महापालिका आयुक्तांनी सुरू केलेल्या अपात्रतेच्या कारवाईविरोधात विशाखा राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. परंतु, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या या झटक्यानंतर विशाखा राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले.