पत्नी आठ महिन्यांची गर्भवती, बाळाच्या जन्माआधीच वडिलांचे छत्र हरपले; महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

नागपूर-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली असून या अपघातात दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

पत्नी आठ महिन्यांची गर्भवती, बाळाच्या जन्माआधीच वडिलांचे छत्र हरपले; महामार्गावरील भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Maharashtra News

अमरावती-नागपूर महामार्गावर तिवसा तालुक्यातील वरखेड फाट्यानजीक भीषण अपघात घडला आहे. नागपूर-अमरावती महामार्गावर भरधाव ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली असून या अपघातात दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. निखिल बोके आणि कैलास कळंबे अशी मृत तरुणांची ओळख असून या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून हत्या; शेतातील निवासस्थानासमोर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

समोर आलेल्या माहितीनुसार, दोघेही उंबरखेड येथील रहिवासी आहेत. तिवसा येथून आपल्या गावी परतत असताना वरखेड फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोघांनाही जीव गमवावा लागला. या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे कैलास कळंबे यांच्या पत्नी आठ महिन्यांच्या गर्भवती आहेत. पुढील महिन्यात त्यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार होते.

मात्र, बाळाच्या जन्माआधीच नियतीने त्याच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हिरावून घेतले. ज्या घरात काही दिवसांत आनंदाचे वातावरण निर्माण होणार होते, त्या घरावर आता दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन तरुणांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या अपघातादरम्यान ट्रॅव्हल्स चालकाला ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number