लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! राज्य सरकारकडून निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार 1500 रुपये?

राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 344 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला असून, यामुळे ऐन सणासुदीच्या काळात महिलांची दिवाळी आनंदात साजरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

लाडक्या बहिणींसाठी खूशखबर! राज्य सरकारकडून निधी मंजूर; खात्यात कधी जमा होणार 1500 रुपये?
Ladki Bahin Yojana

दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर सप्टेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तब्बल 344 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर केला असून, यामुळे ऐन सणासुदीच्या काळात महिलांची दिवाळी आनंदात साजरी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सप्टेंबरच्या 1500 रुपयांच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी सुपूर्द

दीर्घ काळापासून सप्टेंबर महिन्यातील 1,500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांची चिंता आता दूर झाली आहे. महिना संपून दिवाळी जवळ आल्यामुळे महिला वर्गामध्ये चिंतेचे सावट होते. मात्र, शासनाने महिला व बालविकास विभागाला 344.62 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास अधिकृत मंजुरी दिल्याने बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची तांत्रिक प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून अनुसूचित जाती घटकांसाठी तरतूद

या महत्त्वाकांक्षी योजनेतील अनुसूचित जाती घटकातील पात्र महिलांना निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय पावले उचलण्यात आली आहेत. राज्य शासनाने सामाजिक न्याय विभागाच्या निधीतील 344.62 कोटी रुपयांची रक्कम महिला व बालविकास विभागाच्या मुख्य सचिवांकडे अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विशिष्ट प्रवर्गातील लाभार्थी महिलांना विनाअडथळा हप्त्याचे वाटप केले जाईल.

हेही वाचा – सोन्याच्या भावात पुन्हा वाढ! मुंबईसह तुमच्या शहरात आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

येत्या काही दिवसांत थेट महिलांच्या बँक खात्यात पैसे

प्रशासकीय मान्यता आणि निधीचे वितरण पूर्ण झाल्यामुळे येत्या काही दिवसांतच पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात (DBT) 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात होईल. शासनाच्या या निर्णयामुळे ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक आधार मिळाला असून, संपूर्ण राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number