अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग; लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार?

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मान्यता मिळविण्याकरिता विभागीय सहनिबंधकांकडून सहकार प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या हालचालींना वेग; लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार?
amravati district bank election

सुरेंद्र आकोडे, प्रतिनिधी 

अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, निवडणूक घेण्यासाठी आवश्यक मान्यता मिळविण्याकरिता विभागीय सहनिबंधकांकडून सहकार प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर लगेचपुढील आठवड्यात, म्हणजेच 31 ऑक्टोबरपूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा : कर्जत वृक्षतोडीवर फडणवीसांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी 14 ऑक्टोबर रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आता निवडणूक कार्यक्रमाकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. नियोजित प्रक्रियेनुसार मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 11 ते 20 दिवसांच्या आत निवडणूक घेण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने निवडणूक घेण्यास मान्यता मिळविण्यासाठी प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला आहे. प्राधिकरणाकडून मान्यता मिळाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या तारखांबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे. निवडणुकीची प्रक्रिया पुढे सरकण्याची शक्यता निर्माण झाल्याने बँकेच्या सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number